Prof. Sanjay Mandlik यांना विधान परिषदेवर संधी द्या; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे कार्यकर्त्यांची मागणी

41
Prof. Sanjay Mandlik यांना विधान परिषदेवर संधी द्या; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे कार्यकर्त्यांची मागणी
Prof. Sanjay Mandlik यांना विधान परिषदेवर संधी द्या; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे कार्यकर्त्यांची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे माजी खासदार संजय मंडलिक (Prof. Sanjay Mandlik) यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची आग्रही मागणी पुढे आली आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागा दीर्घकाळापासून रिक्त होत्या. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सात जागा भरण्यात आल्या आहेत. मात्र पाच जागा अद्याप रिक्त आहेत. त्यातील एका जागेवर प्रा. संजय मंडलिक (Prof. Sanjay Mandlik) यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

( हेही वाचा : Border – Gavaskar Trophy : बोर्डर – गावसकर मालिकेच्या बक्षिस समारंभात बोर्डर होते, मग गावसकर का नव्हते? )  

प्रा. संजय मंडलिक यांना शिक्षण क्षेत्रात प्राध्यापक ते संस्थाचालक असा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एका जागेवर मंडलिकांच्या नावाची शिफारस करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बाहेर पडत ४० आमदारांसह केलेल्या बंडानंतर कोणावरही अडचण आल्यास त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल, अशी ग्वाही शिंदेंनी दिली होती. त्यामुळे लोकसभेत पराभूत झालेल्या प्रा. संजय मंडलिक (Prof. Sanjay Mandlik) यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करावी. त्यांच्या अनुभवाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना पक्षाला होईल, असे सांगण्यात येत आहे.

याआधी लोकसभेत पराभूत झालेल्या शिवसेनेच्या माजी खासदार भावना गवळी, हेमंत पाटील, कृपाल तुमाने यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली. मात्र आता उर्वरित तीन सदस्य राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहे. त्यात संजय मंडलिक, हेमंत गोडसे (Hemant Godse), राहूल शेवाळे (Rahul Shewale) यांचा समावेश आहे. त्यातच प्रा. संजय मंडलिक यांची शिक्षण क्षेत्रातील जागेवर विधानपरिषदेवर नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Prof. Sanjay Mandlik)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.