-
जयेश शत्रुघ्न मेस्त्री
“चला चला चला, सगळे रांगेत बसा…सगळ्यांना मिळणार, चाय आणि बिस्कुट.. ए बाबा, तुझं काय? तुला वेगळं सांगायला हवं का? रांगेत ये…” पॉवरफुल सायबांचा नामाकूल चेला सर्व पत्रकार आणि इन्फ्युएन्सर्सना गप्प राहायला सांगत होता. सगळेच जण आज चाय आणि बिस्कुट मिळणार म्हणून खुशीत होते. आपली जीभ लांब बाहेर काढून आपला आनंद व्यक्त करत होते. जो शिरेल सायबांच्या कुशीत (म्हणजे मर्जित) तो नेहमीच राहिल खुशीत, हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. नामाकूल चेला खरं तर सायबांच्या आशीर्वादाने स्वतःच मोठा नेता झाला होता. अशी सभा सायब प्रत्येक वेळी घेत. महाराष्ट्राचं (Maharashtra) वातावरण अस्थिर ठेवण्यात त्यांनी वर्षानुवर्षे निष्ठेने पुढाकार घेतला होता आणि या वयातही त्यांचा उत्साह जरा सुद्धा कमी झाला नव्हता. उलट वाढत्या वयासोबत उत्साह देखील वाढत होता. सायब ऑनलाईन येईपर्यंत सायबांचे फुटेज स्क्रीनवर दाखवले जात होते. सर्व मंडळी चाय आणि बिस्कुटचा आनंद लुटत होते. तेवढ्यात स्पीकरमधून खरखर असा आवाज ऐकू आला. स्क्रीनवर वीज चमकल्यासारखी झाली आणि अचानक सायब अवतीर्ण झाले. तसे सर्व जण गुडघ्यावर बसून व दोन्ही हात छातीपुढे नेऊन थोडे झुकवून आणि जीभ लांब बाहेर काढून सायबांचं अभिवादन केलं.
(हेही वाचा – छत्तीसगड येथे ५० नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण; Naxalite Movement संपवण्याच्या घोषणेच्या दिशेने केंद्राची वाटचाल)
नामाकूल चेल्याने पुन्हा सूत्र हाती घेतले. ’सर्व पुरोगामी (Progressive) आणि सेक्युलरांना माझा नमस्कार. आज आपण इथे का जमलो आहोत हे वेगळं सांगायला नको” तेवढ्यात समोरुन आवाज आला “संविधान वाचवायला.” (Constitution) त्यांची प्रत्येक सभा संविधान वाचवण्यासाठी असते, म्हणून हे उत्तर अपेक्षितच होतं. परवा यांच्यातलाच कुणीतरी इफ्तार पार्टीला (Iftar party) गेला होता. एकाने विचारलं कुठे गेलेलास रे, तर म्हणे संविधान वाचवायला. यांची प्रत्येक क्रिया, प्रत्येक गोष्ट संविधान वाचवण्यासाठीच असते म्हणे! असो. नामाकूल चेल्याने आपल्या भारदस्त मिश्यांवरुन हात फिरवला, “अगदी बरोबर.” सायबांनीही स्क्रीनमधून ईस्माईल केलं. “आपण संविधान वाचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. आपलाच एक बंधू आज संकटात आहे. त्याला वाचवून आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आहे.” सगळ्यांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं. “अरे असे बुचकुळ्यात काय पडलात. मी कॉमेडीच्या बादशाहबद्दल बोलतोय.” तेवढ्यात ’बादशाह ओ बादशाह, बादशाह ओ बादशाह, बादशाह…” ही रिंगटोन वाजली. तशी सर्वांची ट्युब पेटली. “हो हो. अरे एक कविता, एक विडंबन गीत एवढं झोंबतं की लगेच थेटराची तोडफोड होते? ही लोकशाही (Democracy) आहे की मुघलाई?” तेवढ्यात कुणीतरी नामाकूल चेल्याच्या कानात म्हटलं, “अहो, मुघल तर आपले वैचारिक पूर्वज. पेशवाई (Peshwai) म्हणा…” “हा हा… ही लोकशाही आहे की पेशवाई?” तसे सगळे “शेम शेम शेम शेम” म्हणत केकाटू लागले. सायबांनी स्क्रीनमधूनच सर्वांना शांत राहण्याचा इशारा केला. तशी सर्वांनी पुन्हा जीभ बाहेर काढली.
(हेही वाचा – Nashik Airport : देशांतर्गत विमानसेवा सोमवारपासून सुरू होणार)
“मग आपण काय करायचं संविधान वाचवण्यासाठी?” एका पत्रकाराने सवाल केला. “निषेध करायचा. हे सरकार आपलं नाही, हे सरकार संविधानविरोधी आहे म्हणून बोंबलत बसायचं.” “नेहमीप्रमाणे?” पुन्हा प्रामाणिक प्रश्न आला. “होय, नेहमीप्रमाणे…” तितकंच प्रामाणिक उत्तर दिलं गेलं. “”पण चेले सायब, ते लोक आता आपल्यावरच उलटलेत. आम्ही असं म्हणू लागलो तर चितळेताई, राणौतमेम, रिपब्लिकदादा, कोकणकाका, अनं…..” “ए बाबा, अनंत नको रे.. अनंत नको. मला अनंतात विलीन झाल्यासारखं वाटतं.” नामाकूल चेले डोकं धरुन बसले. मात्र सायबांनी घसा खाकरल्याबरोबर ते पुन्हा उठून उभे राहिले. “हे पाहा, पुरोगामी (Progressive) आणि सेक्युलरांनो, ते आपली लफडी, आपलं ते… प्रकरण बाहेर काढतील. पण या सर्व गोष्टी संविधान वाचवण्यासाठी गरजेच्या होत्या. तुम्ही ज्या ज्या लोकांनी नावे उच्चारलित ते संविधानाच्या विरोधात होते. म्हणून त्यांच्यावर आपण कठोर कारवाई केली. आपण कुणाचे घर तोडले,” तेवढ्यात “फक्र है फक्र है” आरोळ्या उठू लागल्या. “कुणाला जेलमध्ये सडवलं…” पुन्हा “फक्र है फक्र है” “कुणाला बेदम मारलं.” “फक्र है फक्र है” “कुणाला भरल्या ताटावरुन उठवलं.” “फक्र है फक्र है” “पण हे सगळं आपण संविधान वाचवण्यासाठी केलं. ते संविधानाच्या विरोधात होते म्हणून केलं. सांगा काय चुकीच केलं?” “काही नाही. आपण सगळं बरोबर केलं. आपण केलेले अत्याचार हे अत्याचार नसून शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेली पवित्र कृती आहे.” असं एका पत्रकाराने म्हणताच, सायबांनी ईस्माईल केलं. लगेच नामाकूल चेलेंनी घोषित केलं, “तुमची विधानपरिषद (Legislative Council) पक्की…” हे ऐकताच त्या पत्रकाराने गुढघ्यावर बसून हात छातीपुढे करुन थोडे झुकवून व जीभ लांब बाहेर काढून आपली निष्ठा व्यक्त केली. सायबांनी हात वर करुन आशीर्वाद दिला. अचानक स्पीकरमधून खरखर असा आवाज झाला आणि स्क्रीनवर वीज चकल्यासारखं झालं आणि सायब अदृश्य झाले. तशी नामाकूल चेलेंनी सभा संपल्याची घोषणा केली. “लागा आपल्या कामाला.” मग “भौ” या गीताने सभेची सांगता झाली. “आज उन्ह जरा जास्तंच हाय नै.” बाहेर पडताना कुणीतरी म्हटलं. “हो ना, बारीश असती तर सायबांचं प्रत्यक्ष दर्शन झालं असतं…” ही खंत मनात ठेवून सगळे बाहेर पडले. सगळा सभागृह (Hall) रिकामी झाला, नामाकूल चेले मात्र खुर्चीवर बसून एकटक अनंतात पाहत होते…
हेही पहा –
Join Our WhatsApp Community