EDने जप्त केलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटणार, पंतप्रधान मोदींची घोषणा

कृष्णानगर लोकसभा मतदारसंघात तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात भाजपा उमेदवार अमृता रॉय रिंगणात आहेत. रॉय यांच्यासोबत टेलिफोनवर केलेल्या संभाषणात पंतप्रधान मोदी यांनी हा मुद्दा सांगितला आहे.

286
EDने जप्त केलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटणार, पंतप्रधान मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बुधवारी एक मोठी घोषणा केल्याची माहिती पुढे आली आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीने जप्त केलेली मालमत्ता जनतेला मिळावी, यासाठी आम्ही काम करत आहोत, असे पश्चिम बंगालच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. (ED)

कृष्णानगर लोकसभा मतदारसंघात तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात भाजपा उमेदवार अमृता रॉय रिंगणात आहेत. रॉय यांच्यासोबत टेलिफोनवर केलेल्या संभाषणात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी हा मुद्दा सांगितला आहे. (ED)

कायदेशीर तोडगा काढला जाईल

अमृता रॉय यांच्याशी बोलताना मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, बंगालचा वारसा जतन करण्याचे आव्हान तुमच्यासमोर आहे. यावर रॉय म्हणाल्या की, लोकांचा मोदी सरकारच्या कामावर विश्वास आहे. त्यानंतर मोदी म्हणाले की, ‘मी सध्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करत आहे. ईडीने पश्चिम बंगालमध्ये ३ हजार कोटी रुपये जप्त केले आहेत. हा पैसा गरिबांचा आहे. कुणी शिक्षक बनण्यासाठी पैसे दिले, तर कुणी क्लार्क बनण्यासाठी पैसे. मी सध्या यासंदर्भात कायदेशीर बाबींचा अभ्यास करत आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कायदेशीर तोडगा काढला जाईल आणि नियम बनवला जाईल,’ अशी इच्छा मोदींनी व्यक्त केली आहे. (ED)

(हेही वाचा – MNS : मनसेची महायुतीशी चर्चा सुरूच; चर्चा फिस्कटली तर राज ठाकरेंचा काय आहे प्लॅन बी?)

गरिबांचा पैसा परत करण्यासाठी मार्ग शोधला जाणार

असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, गरिबांनी लाचेच्या स्वरुपात ३ हजार कोटी रुपये दिले आहेत. गरिबांना त्यांचे पैसे परत करण्याची इच्छा आहे, असे मोदी (PM Narendra Modi) म्हणाले आहेत अशी माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. बंगाली लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा, ईडीने जप्त केलेले ३ हजार कोटी रुपये परत देण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधत असल्याचं मोदी म्हणाले, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी आणि रॉय यांच्या झालेल्या संवादाचं विवरण देताना पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की, पंतप्रधानांचा अंदाज असा आहे की, लाचेच्या स्वरुपात दिलेली रक्कम ती ३ हजार कोटी रुपये आहे. याबाबत लोकांना जागरूक करून सत्तेत आल्यानंतर तातडीने हे पैसे देण्यासाठी मार्ग शोधला जाणार आहे. (ED)

महुआ मोईत्रांची भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी….

विद्यमान खासदार महुआ मोईत्रा एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशीला सामोऱ्या जात आहेत. लाच आणि इतर लाभाच्या बदल्यात त्यांनी एका व्यावसायिकाला संसदेच्या वेबसाइटवर ‘लॉग-इन’ करण्याची परवानगी दिली होती. विद्यमान खासदार मोईत्रा तुरुंगात जाणार असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला, हे ऐकून पंतप्रधानांना (PM Narendra Modi) हसू आवरेनासे झाले होते. (ED)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.