शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांना ED चा दणका! 11 कोटींची मालमत्ता जप्त

158

एनएसीएल घोटाळयाप्रकरणी ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटी 36 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. पीएमएलए अॅक्ट म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग (PMLA) अॅक्ट अंतर्गत त्यांची ही प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे. ठाण्यातील सरनाईक यांचे दोन फ्लॅट आणि इतर मालमत्तेचा यात समावेश आहे.

ठाण्यामधील पोखरण रोड क्रमांक 1 येथे उभारलेल्या छाबय्या विहंग गार्डन प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, कारण ठाणे महानगरपालिकेने 2008 मध्ये या कंपनीला दंड ठोठावला होता. राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन दंड माफ केला आहे. प्रताप सरनाईक यांच्या कंपनीच्या दंड माफ प्रकरणावरुन भाजप आक्रमक झाले आहे. ठाण्यातील सरनाईक यांच्या इमारतीचा दंड माफ करण्याचा निर्णय गुरूवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाने विरोध दर्शविला असला तरीही राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर या विरोधात शुक्रवारी भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन देखील करण्यात आले.

(हेही वाचा – बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरेंसह ‘या’ राजकीय नेत्यांची नावे)

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने 2013 च्या FIR क्रमांक 216 च्या आधारे 30.09.2013 रोजी आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलिसांनी नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (NSEL) प्रकरणात त्याचे संचालक आणि NSEL चे प्रमुख अधिकारी NSELचे 25 डिफॉल्टर आणि इतरांवर मनी लाँड्रिंगअंतर्गत तपास सुरू केला होता. या प्रकरणात, आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूकीचा कट रचला, त्यांना NSEच्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केले आणि बोगस वेअरहाऊस पावत्यांसारखी बनावट कागदपत्रे, खाती तयार केली. पीएमएलएअंतर्गत केलेल्या तपासणीत असे दिसून आले की, अंदाजे 13000 गुंतवणूकदारांचे 5600 कोटी एनएसईएलच्या व्यापारी सदस्यांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, थकीत कर्जाची परतफेड आणि इतर ठिकाणी वळवले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.