इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम या संघटनेने प्रत्येक मतदारसंघात ४०० हुन अधिक उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. तसाच निर्णय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी घेतला आहे. ज्यामुळे तिथे मतपत्रिकेवर (Ballot Paper) निवडणूक घ्याव्या लागतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही उमेदवार देणार
सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त ३८४ उमेदवार असल्यास इव्हीएमवर मतदान घेतले जाते. एका बीयूमध्ये १६ बटन असतात. त्या हिशेबाने ३८४ उमेदवार असल्यास २४ बीयू लागतात. व्हीव्हीपॅट आणि सीयू एकच असते अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास तेथे ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर (Ballot Paper) म्हणजेच मतदानपत्रिकेवर मतदान घेण्यात येते. मात्र त्यासाठी निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन मागवले जाते. म्हणून गावागावातून उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी बैठका देखील घेतल्या जात आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात देखील मराठा उमेदवार उभे करण्याचा निर्णय झाला आहे. केवळ उमेदवारी अर्ज भरून काही होत नाही. अर्ज भरल्यानंतर त्याची छाननी केली जाते. सर्व नियमांची पूर्तता केल्यानंतरच अर्ज वैध ठरला जातो. त्यामुळे इतक्या घाईने बोलणे योग्य नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतर वैध ठरलेल्या उमेदवारांच्या संख्येनंतरच निर्णय घेण्यात येईल.
Join Our WhatsApp Community