“वेदांता प्रकल्पात टक्केवारी मागितली हे सिद्ध करुन दाखवा”; अजित पवारांचे शिंदेंना आव्हान

162

मी दसरा मेळाव्यात झालेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही भाषणे ऐकली. मात्र काहींची भाषणे नको तितकी लांबली असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. तसेच, वेदांता प्रकल्पावर शिंदेंनी केलेल्या आरोपावर पवार म्हणाले की वेदांता प्रकल्पात टक्केवारी मागितली हे सिद्ध करुन दाखवा, असे म्हणत त्यांनी शिंदे यांना आव्हान दिले आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने दोन लाख तरुणांचा रोजगार गेला आहे. यातून तरुणांचा रोष आपल्यावर येईल, त्यासाठी अशी वक्तव्ये केली जात असल्याचे, अजित पवार म्हणाले. दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. यामध्ये काॅंग्रेसने आधीच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. आता त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसनेदेखील शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे अजित पवार म्हणाले.

( हेही वाचा: दहशतवादाविरोधात सक्रिय, समन्वित मोहिमा राबवण्याची गरज: अमित शाह )

सर्वसामान्य लोकांना एसटी मिळली नाही

दसरा मेळाव्यासाठी 10 कोटी रुपये खर्चून बसेसची व्यवस्था केली होती. परंतु, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ST मिळाली नाही, असे म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटावर टीका केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.