भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी आणि मुंबई महानगरपालिकेवर गंभीर आरोप केले होते. करण जोहरच्या पार्टीत अनेक सेलिब्रेटी सहभागी झाले होते. यातील अनेक जणांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तसेच या पार्टीत सरकारमधील मंत्री उपस्थित होता असा दावा शेलारांनी केला होता. या आरोपावर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिउत्तर देत कोणता मंत्री होता ते सिद्ध करा, असे आव्हान केले आहे.
अन्यथा जनतेची माफी मागा!
कोरोना काळात संकटाला सामोरे जावे लागत असताना, महानगरपालिका कायम सतर्क असते. करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत नक्की कोण मंत्री होते? ते सिद्ध करा, नाहीतर जनतेची माफी मागा, असे आव्हान किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांना केले आहे. अधिकार दिले म्हणून काहीही बोलू नये. भाजपचे नेते खोटे बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशी टीकाही महापौरांनी केली आहे.
( हेही वाचा : गुलाबाराव पाटलांच्या वक्तव्यावर हेमा मालिनी काय म्हणाल्या? वाचा… )
करणच्या पार्टीवरून वाद
करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांच्यासह चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. या पार्टीवरून बरेच वाद निर्माण झाले होते. आम्ही शिवसेनेच्या रणरागिनी आहोत. खोटे आणि बेछुट आरोप आम्ही खपवून घेणार नाही. माझ्यावर जो शिंतोडे उडवले, त्याला मी बघेनच, असा इशाराही किशोरी पेडणेकरांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community