Pratap Sarnaik : राज्यातील एसटी महामंडळाच्या (ST Corporation) बसला ‘लालपरी’ या नावाने ओळखले जाते. जी एसटी बस गावागावांत लोकांना जोडण्याचे काम करते. मात्र, मागील काही वर्षांत जुन्या बसमध्ये मोठ्या प्रमणात बिघाड आणि नादुरुस्त झाल्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट होत आहे. अशातच नवीन बस राज्यातील प्रत्येक आगारात दाखल होणे अपेक्षित आहेत. त्यामुळे नवीन बस (ST New Bus) प्रत्येक एसटी आगारात द्या. असा आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला दिला आहे. (Pratap Sarnaik)
दरम्यान, राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात नवीन बस दाखल होणार असून या बस स्वतःच्या मतदारसंघात याव्यात यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चुरस लागली आहे. या संदर्भात महामंडळाकडे बसच्य मागणीबाबत पत्रांचा वर्षाव होऊ लागला आहे. तसेच गेली अनेक वर्षे महामंडळाच्या ताफ्यात पुरेशा बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच ताफ्यातील उपलब्ध बसची स्थिती दयनीय असून खिळखिळीत झालेल्या नादुरुस्त बस राज्यातील रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी लोकप्रतिनिधींकडे नव्या बससाठी तगादा लावला आहे.
(हेही वाचा – नौदलाने Rafale खरेदीसाठी ६४ हजार कोटींची डील)
तसेच एसटीच्या (ST Bus) ताफ्यात स्वमालकीच्या २,६४० बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. परंतु या बस राज्यातील सर्व आगारांना उपलब्ध होणे गरजेचे आहे. यंदा २ हजार ६४० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. आतापर्यंत एसटीच्या एकूण २५१ आगारांपैकी ११३ आगारात नवीन लालपरी बस पोहोचल्या आहेत. या आगारात (ST Depot) ८८२ बस दाखल झाल्या असून प्रवासी सेवेत रुजू झाल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत सर्व २५१ आगारांना नवीन बस मिळतील असे नियोजन करावे. अशा सूचना देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी दिल्या आहेत.
हेही पहा –