खासदार नवनीत राणांना केंद्राने दिली Y+ दर्जाची सुरक्षा!

148

महाविकास आघाडी सरकारवर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा अहवाल आहे. यानंतरच त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

देशाच्या VVIP मध्ये नवनीत राणांचा समावेश

केंद्राकडून खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिल्याने आता खासदार नवनीत राणा यांना देशात कुठेही फिरतांना वाय प्लस दर्जाचे सुरक्षा कवच असणार आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांचा देशाच्या VVIP म्हणजेच अति महत्वाच्या व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे. यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांना सुद्धा अशाप्रकारे सुरक्षा पुरविण्यात आली होती. आता नवनीत राणांना केंद्र सरकारने प्रदान केलेल्या या सुरक्षा व्यवस्थेत एसपीओ, एनएसजीचे कमांडो, सीएसएफचे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा पुरविण्यात येणार आहे. आता 24 तास हे सुरक्षा पथक खासदार नवनीत राणा यांच्या समवेत राहणार आहे.

(हेही वाचा – Uber नंतर आता Ola नेही वाढवले भाडे, ‘या’ शहरांतील प्रवास महागला!)

खासदार राणा यांचे हे वाय प्लस सुरक्षा पथक बुधवारी दुपारी अमरावतीत दाखल झाले आहे. या पथकात एकूण 11 कमांडो असतील. केंद्र सरकारने खासदार नवनीत राणा यांच्याकडे कुठलेही पद नसताना त्यांना वाय प्लस सुरक्षा दिल्याने अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, उद्योजक अशा व्यक्तींना सरकारकडून सुरक्षा प्रदान केली जाते. त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची, याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो. एक्स, वाय, झेड आणि एसपीजी कमांडो असे सुरक्षेचे विविध प्रकार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.