one nation one election घटनादुरुस्तीत काय असतील तरतुदी ?

61
one nation one election घटनादुरुस्तीत काय आहे तरतूद ?
one nation one election घटनादुरुस्तीत काय आहे तरतूद ?

देशात ‘एक देश एक निवडणूक’ लागू करण्यासाठी राज्यघटनेतील कलम 82 नंतर नवे कलम 82A समाविष्ट केले जाणार आहे. त्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत.

देशात ‘एक देश एक निवडणूक’ (one nation one election) लागू करण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत. १६ डिसेंबर रोजी हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. या विधेयकाला 129 वे घटनादुरुस्ती विधेयक म्हटले जाईल. निवडणूक आयोग एकाच वेळी लोकसभा (loksabha election) आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका घेईल. भारतीय संविधानाच्या भाग 15 मधील निवडणुकीविषयीच्या तरतुदी लोकसभा आणि राज्य विधानसभांना लागू रहातील.

(हेही वाचा – MADARSAS Rail Jihad : रेल्वेगाड्या रुळांवरून घसरवण्यामागे मदरशांचा हात ?; अन्वेषण यंत्रणांना संशय)

काय आहे कलम 82 A ?

देशात ‘एक देश एक निवडणूक’ लागू करण्यासाठी राज्यघटनेतील कलम 82 नंतर नवे कलम 82A समाविष्ट केले जाणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर राष्ट्रपती पहिल्यांदा या कलमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी लोकसभेची बैठक बोलावतील आणि त्यासाठीची अधिसूचना ज्यादिवशी प्रसिद्ध होईल, त्या तारखेला ‘नियुक्तीची तारीख’ म्हटले जाईल.

नियुक्तीच्या तारखेनंतर ज्या विधानसभांचे कार्यकाळ संपून निवडणुका होतील, त्यांचा कार्यकाळ लोकसभेच्या कार्यकाळासोबत संपुष्टात येईल. याचा अर्थ लोकसभेनंतर महाराष्ट्राची निवडणूक सहा महिन्यांनी झाली असली तरी पुढल्या लोकसभा निवडणुकीवेळी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेला साडेचार वर्षे झाली असतील तेव्हा विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात आला, असे समजले जाईल.

राज्याची निवडणूक लोकसभेसोबत घेणे शक्य नसल्यास ?

एखाद्या राज्याची निवडणूक लोकसभेसोबत घेणे शक्य नाही असे जर निवडणूक आयोगाला वाटले, तर संबंधित राज्याची निवडणूक नंतर घेण्यात यावी अशी शिफारस आयोग राष्ट्रपतींना करू शकेल. अशा परिस्थितीत ज्या विधानसभेच्या निवडणुका लोकसभेसोबत घेणे शक्य झाले नसेल, त्या राज्य विधानसभांचा कार्यकाळ लोकसभेच्या कार्यकाळासोबतच संपेल.

या कलमातील तरतुदीनुसार जेव्हा निवडणूक आयोग राज्यांच्या निवडणुका जाहीर करेल त्याचवेळी त्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ कधी संपणार हे सुद्धा निवडणूक आयोगच जाहीर करणार, असे प्रावधान करण्यात आले आहे.

का होत आहे घटनादुरुस्ती ?
  • सततच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता व त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होतो.
  • सतत होणाऱ्या निवडणुकांमुळे जनजीवन विस्कळीत होते.
  • प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी यांना त्यांचे मूळ काम सोडून सतत इलेक्शन ड्यूटी करावी लागते.
  • एकाच वेळी राज्य विधानसभा व लोकसभेची निवडणूक होईल , अशी स्थिती आणणे या घटनादुरुस्तीचे उद्दिष्ट आहे. (one nation one election)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.