केंद्रीय कृषि पायाभूत निधी योजने अंतर्गत वर्ष 2025-26 होणाऱ्या 1 लाख कोटी रुपयांच्या वाटपांपैकी 8 हजार 460 कोटी रुपयांची तात्पुरती रक्कम महाराष्ट्र राज्याला दिली असल्याही माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.
या योजनेंतंर्गत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात स्मार्ट आणि अचूक कृषी पायाभूत सुविधा विकास प्रकल्प उभारले जाणार आहे. ही योजना संपूर्ण भारतात 2020 मध्ये सुरू करण्यात आली असून, याद्वारे पात्र प्रकल्पांसाठी पात्र लाभार्थ्यांना मध्यम ते दीर्घ मुदतीचे कर्ज दिले जाते. तसेच प्रधानमंत्री सिंचन लाभ कार्यक्रमातंर्गत महाराष्ट्रासाठी 2 हजार 265 कोटी 76 लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. वर्ष 2022-23 या कालावधीत महाराष्ट्रासाठी पर ड्रॉप मोअर क्रॉप योजनेंतंर्गत केंद्र सरकारकडून 334 कोटी रुपये अर्थसाहाय्य करण्यात आले असून , ज्यामुळे 1 लाख 28 हजार हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली आली असल्याचे नरेंद्र तोमर यांनी सांगितले. सन 2018-19 ते 2022-23 या कालावधीत महाराष्ट्रासाठी एका विशेष पॅकेजद्वारे 1 लाख 65 हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली असल्याची माहितही त्यांनी दिली.
(हेही वाचा Nitin Gadkari : नितीन गडकरींनी मुंबई – गोवा महामार्गाप्रकरणी व्यक्त केला खेद; म्हणाले, पुस्तक लिहिता येईल…)
Join Our WhatsApp Community