स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करण्याची कॉंग्रेसची सवय सर्वश्रुत आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, तुरुंगवास भोगला, यातना सहन केल्या त्यांचा राजकीय फायद्यासाठी पुन्हा एकदा अवमान करून कॉंग्रेसने वादाला तोंड फोडलं आहे. आपले राजकीय हेतू साध्य करू पाहणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पुत्राने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल विधानसभेत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे शुक्रवारी, ८ डिसेंबरला विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपच्या वतीने कॉंग्रेसचा जाहीर निषेध करण्यात आला.
(हेही वाचा – Reserve Bank Monetary Policy : रेपो रेट जैसे थे, जीडीपी वृद्धीदर ७ टक्के राहण्याचा अंदाज )
आपण विधानसभेचे अध्यक्ष असतो, तर बेळगाव येथील विधानसभेतून वीर सावरकर यांचा फोटो काढून टाकला असता, असे अपमानास्पद वक्तव्य करून त्यांनी वीर सावरकर यांचे योगदान काय ? सावरकर यांना वीर ही पदवी कशी मिळाली हे भाजपाने सांगावे ? असे आवाहन त्यांनी केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या या अवमानकारक आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात खर्गेपुत्राविरोधात ठिकठिकाणी निदर्शने करणार असल्याची माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community