राज्यपालांच्या हस्ते राजभवन दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

100

मुंबईतील नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या राजभवनाच्या २०२३ वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. राजभवनातील ‘सौंदर्य स्थळे’ या विषयावर दिनदर्शिका तयार केल्याबद्दल राज्यपालांनी कला दिग्दर्शक व छायाचित्रकारांना कौतुकाची थाप दिली. कार्यक्रमाला राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासाचे अध्यक्ष रवींद्र संघवी व सुचेता संघवी यावेळी उपस्थित होते.

( हेही वाचा : मुंबईतील ४५ % भाडेकरू २ BHK घरांच्या शोधात; भाडेदरात ५.४ टक्क्यांनी वाढ, मॅजिकब्रिक्स रेंटल इंडेक्स अहवाल जारी )

राजभवन दिनदर्शिकेचे प्रकाशन 

यावेळी राज्यपालांच्या हस्ते दिनदर्शिकेचे कला दिग्दर्शक अशोक दाभाडे व डिझाइनर रणजित रणशूर, भाषांतर कर्त्या डॉ मंजुषा कुलकर्णी तसेच छायाचित्रकार प्रतीक चोरगे, अस्मिता माने, सचिन वैद्य, वैभव नडगावकर, राकेश गायकवाड, हृषीकेश परदेशी, नवीन भानुशाली, हनीफ तडवी, नागोराव रोडेवाड, संदीप यादव, दिलीप कवळी, पराग कुलकर्णी व कालिदास भानुशाली यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शासकीय मुद्रणालयाचे अधिकारी प्रमोद धामणकर यांचा देखील दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला.

छायाचित्रकार मुकेश पारपियानी यांच्या संकल्पनेनुसार साकारलेल्या या कॅलेंडरसाठी विविध छायाचित्रे काढली होती. त्यातील निवडक छायाचित्रांचा समावेश दिनदर्शिकेमध्ये करण्यात आला आहे. दिनदर्शिकेचे मुद्रण शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.