आपल्या वक्तव्यातून सामाजिक तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करु नयेत; अजित पवारांचे आवाहन

122

जातीय, धार्मिक सलोख आपल्याला कायम ठेवायचा आहे. आपल्या वक्तव्यातून तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावीत असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. महाराष्ट्र दिनी यशवंत चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे. आपण सुसंस्कृत आहोत. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने काहींनी सभा आयोजित केल्या असतील. असे उपमुख्यमंत्री अजित पवरार यांनी नाव न घेता राज ठाकरेंना सुनावले आहे.

शिवाजीनगरच्या पोलीस संचनल मैदानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 62 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त ध्वजवंदन व संचलन समारंभावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत त्याचे पालन संबंधितांनी करावे म्हणजे वातावरण चांगले राहील, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

तलवारी सापडल्या कशा? याचा तपास सुरु

राज्यात तलवारींचा साठा मोठ्या प्रमाणात सापडला आहे. त्याची माहिती पोलीस खाते घेत आहे. विद्ध्वंस घडवण्याचा काहींचा प्रयत्न असावा. त्या आत्ताच का सापडत आहेत, त्याचा मास्टरमाइंड कोणा, याचा शोध सुरु आहे, असेही ते म्हणाले. पोलीस दल सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवून आहे. तलवारीचा साठा सापडला त्यावर पोलीस जप्तीची कारवाई करत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: राज ठाकरेंच्या सभेला येणारी गर्दी पैसे देऊन आणली जाणार, चंद्रकांत खैरेंचा आरोप )

बेळगाव महाराष्ट्रत नाही याची खंत

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बेळगाव अजून महाराष्ट्रात येऊ शकले नाही, याची खंत कायम राहणार आहे. मात्र ही गावे जोपर्यंत महाराष्ट्रात येणार नाहीत. तोपर्यंत या गावांना पाठिंबा असणार आहे. असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.