धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा यांना अटक

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणा-या करुणा शर्मा यांच्यासह अजयकुमार देडे यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील येरवडा पोलिसांत करुणा शर्मा आणि अजयकुमार देडे यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. येरवड्यातील महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली होती. अखेर पोलिसांनी कारवाई करत करुणा शर्मा आणि अजयकुमार देडे यांना अटक केली आहे.

महिलेला जीवे मारण्याची धमकी 

अजयकुमार देडे व करुणा शर्मा यांनी शस्त्राचा धाक दाखवून, महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच महिलेला घटस्फोटासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला होता. मंगळवारी दुपारी पुणे न्यायालयात या दोघांना हजर करण्यात येणार आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी वैयक्तीक आरोप केल्यानंतर शर्मा यांचे नाव पुढे आले होते.

( हेही वाचा: Smartphone मधून चुकून फोटो delete झाला? या स्टेप्स फॉलो करत करा रिकव्हर )

मी करुणासोबत लग्न करणार आहे, तू मला घटस्फोट दे

शर्मा यांच्यावर तक्रारदार महिलेवर जातीय टिप्पणी केल्याचा आणि हाॅकी स्टिकने धमकावल्याचा आरोप आहे. तसेच, या प्रकरणावरुन फिर्यादीचा पती तिचा छळ करत होता. मी करुणासोबत लग्न करणार आहे, तू मला घटस्फोट दे असे सांगून फिर्यादी महिलेच्या पतीने तिला माहेरी सोडले होते. फिर्यादी महिला आणि तिचा पती हे मूळचे उस्मानाबाद येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here