पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता कमी

102

पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक घोषित झाली आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपचा आमदार होता, मात्र या दोन्ही ठिकाणची पोट निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी झाली आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इच्छूक असल्याचे म्हटले आहे.

म्हणाले अजित पवार?

भाजपकडून चिंचवड येथे शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचे नाव कळवले आहे. तसेच कसबा विधानसभासाठी भाजपची काही नावे पुढे येत आहेत. तसेच दिवंगत मुक्ता टिळक यांचे पतीही इच्छुक आहेत. त्यांचा निर्णय भाजप घेणार आहे. मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी इच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मला शंका आहे, असे अजित पवार म्हणाले.

(हेही वाचा प्रजासत्ताक दिनीनिमित्त राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम)

कोणाची नावे आहेत चर्चेत?

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला आहे. आज शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडणार आहे. ज्येष्ठ नेत्यांशी स्थानिक नेते चर्चा करणार आहे. जर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर चिंचवड शहरातील काही नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे आता जर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला तर राष्ट्रवादी कोणाला रिंगणात उतरवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी 2019 च्या विधानसभेच्या वेळी शिवसेनेतून बंडखोरी केली होती. त्यावेळी ते लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात काही हजारांच्या मतांनी पराभूत झाले होते. या पोटनिवडणुकीच्या उमेदवारांच्या नावामध्ये त्यांच्या नावाचीही चर्चा आहे. तर कसाब मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे-पाटील या इच्छूक असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यापासून इथे काम करायला सुरुवात केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.