Pune Bypoll Election Results 2023: चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, कसब्यात रवींद्र धंगेकर आघाडीवर; जाणून घ्या आतापर्यंतचे अपडेट

174

संपूर्ण राज्याचे लक्ष आज, गुरुवारी जाहीर होणा-या कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे असणार आहे. 2 मार्च, सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून निकालाचे चित्र दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होईल. परंतु आतापर्यंत निकालाच्या सात फे-या संपणार आहेत. अजून 13 फे-यांचे निकाल हाती येणे बाकी आहे.

कसबा पोटनिवडणुकीत मतमोजणी सुरु आहे. पहिल्या टप्प्यात मविआचे रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. धंगेकर 5 हजार 844 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे हेमंत रासणे 2 हजार 863 मतांवर आहेत. सध्या कसब्यात भाजपचे हेमंत रासणे आणि मविआचे रवींद्र धंगेकर यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.

( हेही वाचा: ‘डेंजर मॅन’ सापडला इंदोरमध्ये; एटीएसने नोंदवला जबाब )

चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. पहिल्या आणि दुस-या फेरीनंतर 11 हजार 222 मत घेऊन भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. तर मविआचे नाना काटे 9 हजार 435, राहुल कलाटे 3 हजार 942 मतांवर आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.