Pune Car Accident: पुण्यातील ड्रंक अँड ड्राइव प्रकरणावर अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप म्हणाले…  

259
Pune Car Accident: पुण्यातील ड्रंक अँड ड्राइव प्रकरणावर अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप म्हणाले...  

पुण्यातील ड्रिंक अँड ड्राइव (Pune Car Accident) अपघाताची देशभर चर्चा होत आहे. यामध्ये भरधाव वेगात आलेल्या आलिशान कारने मोटारसायकलला धडक दिली, यात दोघांचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत १७ वर्षीय अल्पवयीन कार चालवत होता. या प्रकरणातील पोलिसांच्या तपासावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. (Pune Car Accident) 

दरम्यान काही दिवसांपूर्वी अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) याला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्यात आले. तसेच आता मृतकच दारु पिऊन होते हे दाखविण्यासाठी त्यांचा व्हिसेरा रिर्पोट (Viscera Report) अल्कोहोल पॉझिटिव्ह येण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची गंभीर माहिती शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.

(हेही वाचा – Congress Internal Conflict : काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर)

पुण्यातील कल्यानीनगर (Pune Kalyaninagar) भागात भरधाव आलिशान कारणे मोटारसायकला धडक दिलेल्या दोघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या या तरुणांच्या शवविच्छेदनाच्या वेळी मृतकांचा व्हिसेरा काढण्यात आला. त्यात थोडा दारुचा अंश टाकुन व्हिसरा रिर्पोट हा अल्कोहोल पॉझिटिव्ह आणायचा. यामुळे न्यायालयात असे समोर येईल की, मृतक हे दारु पिऊन होते आणि कार चालविणारा हा दारु पिलेला नव्हता. म्हणजे विशाल अग्रवालचा मुलगा हा निर्दोष मुक्त होऊ शकेल या पध्दतीने प्रयत्न सुरु असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. (Pune Car Accident)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.