Pune Car Accident: धंगेकरांनी उघड केली हफ्त्याची टक्केवारी

पब आणि ड्रग्जच्या मालकांकडून पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करण्याचे गोरख धंदे करतात. असा आरोप आ. रवींद्र धंगेकर यांनी केला.

281
Pune Car Accident: धंगेकरांनी उघड केली हफ्त्याची टक्केवारी...

बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कार (Porsche car Accident) चालवून दोन इंजिनिअर्सना चिरडून मारलं. दरम्यान या अपघातानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. याचप्रकरणी शरद पवार गटाचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागात धडक (Pune Excise Department) देत पुणे शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मालकांकडून पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करण्याचे गोरख धंदे करतात, याचा पाढाच वाचून दाखवला. (Pune Car Accident) 

(हेही वाचा – Ramdas Athavale : संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे असून महायुतीमध्ये एकजूट – रामदास आठवले)

पुणे शहरात अवैधरित्या हॉटेल, पब हे पोलिसांच्या आशीर्वादामुळे चालू असल्याची टीका स्थानिक रहिवाशांनी केली आहे. याच संबंधी रवींद्र धंगेकर यांनी यांच्यासह काही राजकीय मंडळीनी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागात भेट दिली. यामध्ये पुणे शहरात अवैध सुरु असलेल्या पबसंदर्भात जाब विचारत होते. तसेच शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर पब (Illegal Pub) सुरु आहे. परंतु त्याच्यावर हप्तेवसुलीमुळे कारवाई होत नाही. आमच्याबरोबर चला, आम्ही तुम्हाला बेकायदेशी सुरु असलेले पब दाखवतो, असे त्यांनी म्हटले. तसेच कोणत्या पबकडून महिन्याला किती वसुली होती, त्याची यादी पुन्हा वाचून दाखवली. आपण हप्ते घेतानाचे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहे. पुणेकरांसाठी तुम्ही कारवाई करा, असे या रविंद्र धंगेकर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच येत्या ४८ तासांत बेकायदेशीर पब वर कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.