Pune Car Accident: डॉ. अजय तावरेंविरोधात वातावरण संतप्त; आता भर चौकात फाशी देण्याची मागणी

301
Pune Car Accident: डॉ. अजय तावरेंविरोधात वातावरण संतप्त; आता भर चौकात फाशी देण्याची मागणी

पुण्यातील कल्याणीनगर भागात रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) याच्या १७ वर्षीय मुलाने दोन दुचाकीस्वार अभियंत्यांना त्याच्या स्पोर्ट्स कार पोर्शने चिरडले, त्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणावर चारही बाजूने टीका होत आहे. दरम्यान, अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने (blood samples) बदल्यामुळे डॉक्टर तावरेना भर चौकात फाशी द्या. अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत केली. (Pune Car Accident)

महाराष्ट्रातील पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करतात, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. राज्यात सगळ्याच विभागात भ्रष्टाचार सुरु आहे. अशी टीका पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केली. तसेच पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल (Accused Vedant Aggarwal) यांच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टर अजय तावरे (Dr. Ajay Taware) याला भर चौकात फाशी द्या. अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली. कोल्हापूर येथे पत्रकार परिषदमध्ये रवींद्र धंगेकर यांनी डॉ, अजय तावरे यांच्यावर तूफान हल्लाबोल चढविला.  

(हेही वाचा – Vibhav Kumar च्या याचिकेवर कोर्टाचा निर्णय राखीव)

छत्रपती शिवाजी महराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत. येणाऱ्या पुढील काळात ‘उडता पंजाब’ सारखा, महाराष्ट्राचा ‘उडता महाराष्ट्र’ होतोय की काय अशी भीती धंगेकर यांनी व्यक्त केली. कल्याणीनगर अपघात प्रकरणात ससूनच्या लॅबमधील डॉक्टरांची अल्पवयीन आरोपीचे रक्त फेकून देण्यापर्यंत मजल गेली. त्यामुळे पुण्याचे रक्त पिऊन मोठे होणाऱ्या डॉक्टर तावरेला भर चौकात फाशी देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याच्या घटनेत तावरेंचा मोठा हात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी  करण्यात आला.

पब संस्कृतीला विरोध

पुणे प्रकरणात मी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरलो. पब संस्कृती थांबावी अशी माझी मागणी आहे. कारण, पुण्यात देशभरातील विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. ड्रंक अँड ड्राइव्ह  प्रकरणानंतर पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्याने त्यांच्या पालकांचे फोन येत आहेत, असेही रवींद्र धंगेकर यावेळी बोलताना म्हणाले. (Pune Car Accident)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.