आई आजारी आहे म्हणत राज्यातील ‘या’ 4 महिला आमदारांची आर्थिक फसवणूक!

166

राज्यातील भाजपच्या चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक समोर आला आहे. भाजप आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

‘या’ 4 महिला आमदारांची फसवणूक

आई आजारी असल्याचे कारण देत एका तरूणाने महिला आमदरांकडून पैस उकळले आहे. मेडिकल आणि हॉस्पिटलचं बिल देण्यासाठी तरूणाने आमदारांकडे मदतीची याचना केली. या आमदारांनाही तरूणावर विश्वास ठेवत त्याला मदत करण्यासाठी पैशांची मदत केली. मात्र आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरूणाविरोधात आमदार माधुरी मिसाळ यांनी तक्रार दाखल केली. आमदार माधुरी मिसाळ यांच्या तक्रारीनंतर आर्थिक फसवणुकीचे हे प्रकरण समोर आले आहे.

(हेही वाचा – भारत-चीन सीमेवर काम करणारे BRO चे 18 कामगार बेपत्ता, एकाचा सापडला मृतदेह )

आमदार माधुरी मिसाळ यांच्यासोबत देवयानी फरांदे, मेघना बोर्डीकर आणि श्वेता महाले यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. आई आजारी आहे, असं म्हणत तरुणाने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. सामाजिक बांधिकली जपत आमदारांनीही तरुणाला मदत केली. पण आपली आर्थिक फसवणूक झाली असल्याची तक्रार आता महिला आमदाराच्या वतीने करण्यात आली आहे.

काय घडला प्रकार

मुकेश राठोड असे या तरूणाचे नाव असून तो मराठवाड्याचा असल्याची माहिती आहे. आई आजारी असल्याचे सांगत मुकेश राठोडने या महिला आमदारांकडे आर्थिक मदत मागितली. आमदारांनीही ही मदत ऑनलाईन माध्यमातून मुकेश राठोडला पाठवली. मात्र नंतर तो कॉल फेक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर आमदारांनी त्याच्याविरोधात बिबेवाडीत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून मुकेश राठोड अजूनही फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

letter 2

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.