पुण्यात शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला असून शिवसेनेतून नेत्यांची गळती सूरूच असल्याचे दिसतेय. शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे एकनाथ शिंदें गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. सेनेत रमेश कोंडे यांच्या कडे सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. सोमवारी सकाळी एक हजार कार्यकर्त्यांसह रमेश कोंडे मुंबईला रवाना झाले आहेत. शिंदे यांची भेट घेत आपला पाठिंबा जाहीर करणार आहेत.
रमेश कोंडे हे जिल्ह्यातील दुसरे शिलेदार
राज्यातील सत्तांतर नाट्याचे पडसाद पुणे जिल्ह्यात ही उमटू लागले असून शहरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता. भानगिरे हडपसरमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांच्यामुळे शिंदे गटाला आता पुणे महापालिकेत एक शिलेदार मिळाला आहे. ते दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर रमेश कोंडे हे जिल्ह्यातील दुसरे शिलेदार असतील.
(हेही वाचा – ‘या’ प्रकरणी राऊतांना समन्स, 6 ऑगस्टला शिवडी कोर्टात हजर राहण्याचे आदेश)
कोण आहेत रमेश कोंडे
2019 ला रमेश कोंडे यांनी खडकवासला मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून मोठी तयारी केली होती. मात्र भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेला न दिल्याने कोंडे नाराज होते. त्यानंतर कोंडे 1995 पासून शिवसेनेत आहेत. खेड शिवापुरचे सरपंच, हवेली तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हाप्रमुख अशा पदांची धूरा त्यांनी संभाळली आहे.
माढा, मोहोळ, पंढरपूर तालुक्यांतील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला सोलापूर जिल्ह्यातून पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या वाकाव गावात माढा, मोहोळ, पंढरपूर तालुक्यांसह कुर्डुवाडी शहरातील शेकडो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या वेळी महिला शिवसैनिकही उपस्थित होत्या. काही दिवसांत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शिवाजीराव सावंत यांनी सांगितले. आमदार तानाजीराव सावंत, शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केल्याचे शंभू साठे, संतोष जाधव, महावीर देशमुख, मुन्ना साठे, समाधान मस्के, शिवाजी बाबर, चरणराज चवरे, मधुकर ठोंबरे, समाधान दास आदींनी मनगत व्यक्त केले.
Join Our WhatsApp Community