तिसरी लाट महिन्याभरापूर्वीच आटोक्यात आली असली तरीही पुण्यात मार्च महिन्याचा पंधरवडा सरल्यानंतर रुग्ण संख्या हजारांच्या आत आली आहे. पुण्यात आता केवळ ७८१ रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. बुधवारी पुण्यात ८९४ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु होते. राज्यातही आता रुग्णसंख्या १ हजार ९०६ पर्यंत खाली सरकली आहे.
मृत्यूदर आता १.८२ टक्क्यांवर कायम
गेल्या काही दिवसांपासून राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. गुरुवारी केवळ ३ रुग्णांचा कोरोनावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड आणि बुलडाण्यात कोरोनाच्या उपचारांत प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. नव्या २२९ कोरोना रुग्णांची नोंद झाली असली तरीही ३१५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. राज्यातील मृत्यूदर आता १.८२ टक्क्यांवर कायम आहे.
(हेही वाचा अनिल परबांच्या भोवती आवळला आयकर विभागाचा फास! कुठली आणि किती मालमता लागली हाताला?)
प्रमुख जिल्हानिहाय कोरोना सक्रीय रुग्ण संख्या
जिल्हा – कोरोना रुग्णांची संख्या
- मुंबई – ३२३
- ठाणे – १८९
- रायगड – ३८
- नाशिक – ८२
- पुणे- ७८१
- अहमदनगर – १७२
- नागपूर – ३९