महाविकास आघाडीतील काँग्रेसपाठोपाठ आता शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यादेखील त्यांचे नेते आदित्य ठाकरे यांच्या ‘नाईट लाइफ’च्या विरोधात पुण्याच्या रस्त्यावर उतरल्या आहेत. (Pune ‘Drunk and Drive’ Case)
धंगेकर-अंधारे सोबत
काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पब संस्कृतीवर घाला घालत पुण्यातील अग्रवालसंबंधातील ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ (Drunk and Drive) प्रकरणी पोलिसांवर आरोप केले तेव्हा आपलाच मित्रपक्ष शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हेच ‘नाईट लाइफ’ समर्थक आणि पब संस्कृतीरक्षक’ असल्याचे सोयीस्करपणे विसरले. यामुळे धंगेकर यांच्यासोबत आता शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांनीही आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेविरोधात दंड थोपटले असल्याचे चित्र आहे. धंगेकर यांच्यासोबत अंधारे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना पब संस्कृतिविरुद्ध आवाज उठवला. तरुण पिढी या पब संस्कृतीमुळे बिघडत असल्याची भावना दोघांनी व्यक्त केली आणि आपल्याच नेत्याच्या विरोधात भूमिका घेतली. (Pune ‘Drunk and Drive’ Case)
ठाकरेंचा २४-तास ‘पब’ला पाठींबा
जानेवारी २०२० मध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पर्यटन मंत्री असताना पुण्यातील ‘सर्जा’ या खासगी रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला गेले असताना पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यातही ‘नाईट लाइफ’ म्हणजे दिवस-रात्र हॉटेल्स, पब्स, मॉल, थिएटर सुरू ठेवण्याची कल्पना मांडली होती. त्याला अर्थातच पुणेकरांनी समाजमाध्यमावर प्रचंड विरोध केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी तर मुंबईच्या ठराविक भागात जसे की बीकेसी, नरीमन पॉइंट, काळा-घोडा या उच्चभ्रू परिसरात मॉल, पब, थिएटर २४ तास सुरू ठेवण्याची योजना २६ जानेवारी २०२० पासून प्रायोगिक तत्वावर सुरूही केली होती, मात्र त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने पुढे ती योजना बासनात गुंडाळण्यात आली. (Pune ‘Drunk and Drive’ Case)
धंगेकर ‘पब’सोबत की विरोधात?
धंगेकर यांच्या लोकसभा प्रचारासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुण्यात जाऊन प्रचार केला. त्यामुळे धंगेकर यांना ठाकरे यांची भूमिका मान्य आहे का? असा सवाल आता केला जात आहे. एकीकडे पब संस्कृतीरक्षकांच्या सोबत राहायचे आणि दुसरीकडे पब संस्कृतिविरुद्ध आवाज उठवायचा, ही दुटप्पी भूमिका नाही तर काय? असा प्रश्न आता मुंबई-पुणेकर विचारत आहेत. (Pune ‘Drunk and Drive’ Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community