पुण्यातील कसबाची पोट निवडणूक ही केवळ निवडणूक नाही तर वैचारिक निवडणूक आहे, जी राष्ट्रीय विचार करणारे आणि दुसरे काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यामुळे विरोध करणारे यांच्यात ही निवडणूक आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कसबा येथील पोट निवडणुकीत प्रचारासाठी फडणवीस प्रचारसभेला संबोधित करत होते.
भाजपाला आठरापगड जातीचा पाठिंबा
काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, तर त्यांना पुनेश्वर महादेवाबाबत काय भूमिका आहे? ही लढाई वैचारिक लढाई आहे. त्यांना लांगुलचलनावर विश्वास आहे. पण भाजपाला आठरापगड जातीचा पाठिंबा आहे. आम्ही शाहू, फुले आंबेडकर, लहुजी उस्ताद यांचा विचार मानतो. पुण्यात एमपीएमसी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. त्यावेळी दुटप्पी धोरण समोर आले. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जो निर्णय घेतला. त्याच्या विरोधात आंदोलन केले त्यांना भेटायला शरद पवार गेले, पण खरा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. आम्ही पुण्याचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न करत आहोत, मेट्रो धावत आहे, प्रदूषित नद्या सुरक्षित करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. पुण्यात देशात सर्वात जास्त इलेक्ट्रिक बसेस धावत आहेत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा मोदींना हरवण्यासाठी मेलेल्या मुस्लिमांना आणा; राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरील आवाहनाचा फडणवीसांकडून समाचार )
Join Our WhatsApp Community