Pune Hit And Run Case: काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ‘पब’विरोधी की बाजूने?

202
Pune Hit And Run Case: काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ‘पब’विरोधी की बाजूने?
Pune Hit And Run Case: काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ‘पब’विरोधी की बाजूने?

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पब संस्कृतीवर घाला घालत पुण्यातील अग्रवाल ‘हीट अँड रन’ प्रकरणी (Pune Hit And Run Case) पोलिसांवर आरोप केले तेव्हा आपलाच मित्रपक्ष शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे हेच ‘नाईट लाइफ समर्थक आणि पब संस्कृतीरक्षक’ असल्याचे सोयीस्करपणे विसरले. यामुळे धंगेकर दुटप्पी आहेत किंवा महाविकास आघाडी जनतेला गृहीत धरते आहे, अशी शंका जनतेतून व्यक्त होत आहे.

ठाकरेंचा 24-तास ‘पब’ला पाठींबा

जानेवारी 2020 मध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पर्यटन मंत्री असताना पुण्यातील ‘सर्जा’ या खासगी रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला गेले असताना पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यातही ‘नाईट लाइफ’ म्हणजे दिवस-रात्र हॉटेल्स, पब्स, मॉल, थिएटर सुरू ठेवण्याची कल्पना मांडली होती. त्याला अर्थातच पुणेकरांनी समाजमाध्यमावर प्रचंड विरोध केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी तर मुंबईच्या ठराविक भागात जसे की बीकेसी, नरीमन पॉइंट, काळा-घोडा या उच्चभ्रू परिसरात मॉल, पब, थिएटर 24 तास सुरू ठेवण्याची योजना 26 जानेवारी 2020 पासून प्रायोगिक तत्वावर सुरूही केली होती, मात्र त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने पुढे ती योजना बासनात गुंडाळण्यात आली. (Pune Hit And Run Case)

(हेही वाचा – Maharashtra legislative Election : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची नवीन तारीख जाहीर?)

धंगेकर ‘पब’सोबत की विरोधात?

धंगेकर यांच्या लोकसभा प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांनी पुण्यात जाऊन प्रचार केला. त्यामुळे धंगेकर यांना ठाकरे यांची भूमिका मान्य आहे का? असा सवाल आता केला जात आहे. एकीकडे पब संस्कृतीरक्षकांच्या सोबत राहायचे आणि दुसरीकडे पब संस्कृतिविरुद्ध आवाज उठवायचा, ही दुटप्पी भूमिका नाही तर काय? असा प्रश्न आता मुंबई-पुणेकर विचारत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.