पुण्यात विकेंड लॉकडाऊन! अजित पवारांची घोषणा 

या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्ण दर कमी होतांना दिसत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

108

ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु कोरोनाचा धोका अजूनही गेलेला नाही, त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल राहू नये व जास्तीत जास्त दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. वाढती गर्दी लक्षात घेता शनिवार, रविवारचे निर्बंध कडक करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सील हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी खासदार गिरीष बापट, खा. श्रीरंग बारणे, खा. श्रीमती सुप्रिया सुळे, खा. ॲड. वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, आमदार ॲड. अशोक पवार, आ. संजय जगताप, आ. सुनिल टिंगरे, आ. सुनिल शेळके, आ. चेतन तुपे, आ. सिध्दार्थ शिरोळे, आ. दिलीप मोहिते, आ. श्रीमती माधुरी मिसाळ तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, भुजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा : वैभव नाईकांना ‘शिवप्रसाद’ दिलाय, ‘सामाना’त येऊन देतो! नितेश राणेंचा इशारा )

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता गाफिल राहू नका!

यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, जिल्हयातील शहरी भागात निर्बंध शिथिल केल्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. पुढील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या आठवड्यात जिल्हयातील कोरोनाचा रुग्ण दर कमी होतांना दिसत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य तयारी केली असली तरी नागरिकांनी आवश्यक त्या नियमांचे पालन केलेच पाहिजे.

10 टक्के बेड्स लहान मुलांसाठी राखीव ठेवणे

पोलिस प्रशासनाने वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचेही पवार यांनी सांगून तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आयएलआय आणि सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण, सुपर स्प्रेडर्स वर अधिक लक्ष, हॉटस्पॉटमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट वाढवणे, दुसऱ्या लाटेमध्ये वाढवलेल इन्फ्रास्ट्रक्चर तसेच ठेवणे, सर्व डीसीएचमध्ये 10 टक्के बेड्स लहान मुलांसाठी राखीव ठेवणे, सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे. तसेच तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने लोक शिक्षण व जनजागृती करण्यात येत आहे. केंद्र सरकार कडून लस पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्या नंतर जिल्ह्यात रोज दिड लाख नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन झाल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचा : किसान युनियन आंदोलन बनले गुन्हेगारांचा अड्डा! )

यावेळी डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले राज्यातील तिसऱ्या लाटेची तीव्रता लसीकरणावर अवलंबून असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेतील एकूण रुग्णांपैकी साधारण 25 टक्के रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा अंदाज आहे. साधारण 50 टक्के रुग्णांना रुग्णालयीन सेवेची आवश्यकता भासू शकेल. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हयातील कोरोना प्रादुर्भाव, तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या दृष्टीने तयारी, लहान मुलांना तिसऱ्या लाटेतील धोका, लसीकरण आणि निर्बंध शिथिल केल्यानंतरची परिस्थिती याबाबतची माहिती सादरीकरणाव्दारे दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.