पुण्यातील लोकसभेची पोटनिवडणूक त्वरीत घ्या; Bombay High Courtचा आदेश

204
पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन १० महिने उलटले तरी या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली नाही. या प्रकरणी पुण्यातील रहिवासी सुघोष जोशी यांनी Bombay High Court मध्ये आव्हान दिले. त्यावर Bombay High Court ने ताबडतोब पोट निवडणूक घ्या, असा आदेश दिला.
पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकाला पुण्याचे रहिवासी सुघोष जोशी यांनी आव्हान दिले होते. या ठिकाणी पोटनिवडणूक झालेली नसल्याने या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न लोकसभेत कोण उपस्थित करणार? असा सवाल विचारत पोटनिवडणूक घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला सूचना देण्यात याव्यात, याबाबत सुघोष जोशी यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

काय म्हणाले न्यायालय? 

सुघोष जोशी यांच्या याचिकेप्रकरणी सुनावणी झाली, तेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारत न्यायालयाने म्हटले की, २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीचे काम आणि देशातील अन्य राज्यात विधानसभा निवडणुका सुरू असल्याने पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेऊ शकत नाही, या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेचे समर्थन करता येणार नाही. राजकीय व सामाजिक अस्वस्थता असलेल्या मणिपूरसारख्या ठिकाणी पोटनिवडणूक घेऊ शकत नाही, असे जर निवडणूक आयोग म्हणाले असते तर आम्ही स्थिती समजून घेऊ शकलो असतो, असे मत न्या. गौतम पटेल व न्या. कमल खटा यांच्या खंडपीठाने व्यक्त केले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.