लोकसभा निवडणुकीचे (Pune Lok Sabha Election 2024) विदर्भात दोन टप्पे पार पडले आहेत. मात्र या दोन टप्प्यांत मतदानाचा टक्का फारसा चांगला नाही. विदर्भात यंदा २०१९ पेक्षा कमी मतदान झाले. पुणेकरांनी मतदानाचा (Pune Lok Sabha Election 2024) टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडल्यास त्यांना ५० रुपयांचे पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे. ‘व्होट कर पुणेकर’ या मोहिमेअंतर्गत मतदान करुन एक लिटर ऑईल खरेदी करणाऱ्यास ५० रुपयांचे पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे. पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशने ही मोहीम सुरु केली आहे. (Pune Lok Sabha Election 2024)
२० मे पर्यंत मोहीम सुरू राहणार
पुण्यातील पेट्रोल डिलर्स असोसिएशनने महा एनजीओ फेडरेशन आणि इतर स्वयंसेवी संस्थांना सोबत घेतले आहे. या संस्थांसोबत ‘व्होट कर पुणेकर’ (Pune Lok Sabha Election 2024) मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार मतदान करुन आल्यानंतर बोटावरील शाई दाखवली आणि एक लिटर ऑईल खरेदी केले तर त्यांना ५० रुपयांचे पेट्रोल मोफत मिळणार आहे. पुणे लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर २० मे पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे, अशी माहिती पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिली. (Pune Lok Sabha Election 2024)
घरोघरी जाऊन जनजागृती करणार
पेट्रोल डिलर्स असोसिएशन फक्त मोफत पेट्रोल देऊन थांबणार नाही. तर घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदान (Pune Lok Sabha Election 2024) केंद्रापर्यंत नेण्यासाठीही मदत करणार आहे. मतदानाच्या दिवशी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मदत करणार आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांना २० हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. (Pune Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community