पुणे लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या सुरेश कलमाडी यांना कायमचेच घरी बसवून मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजपाचे खासदार निवडून येत आहे. सन २०१४मध्ये अनिल शिरोळे आणि त्यानंतर २०१९नंतर गिरीश बापट हे निवडून आले. परंतु गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपाने या १८ व्या लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. या लोकसभा मतदार संघात युतीचे पाच आमदार असून महायुतीचे उमेदवार मोहोळ यांची बाजू सरस असल्याचे दिसून येत असले तरी प्रत्यक्षात प्रथमच आमदार बनवून लोकसभेच्या निवडणुकीत उतरणारे धंगेकर हे भाजपाला विजयाची हॅट्रीक करण्यापासून रोखतात की भाजपा विजयाची हॅट्रीक करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Pune Lok Sabha Election 2024)
पुणे लोकसभा मतदार संघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे, कसबा पेठ आदी सहा विधानसभा क्षेत्र असून त्यातील शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती आणि पुणे या चार विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपाचे आमदार आहेत. तर वडगाव शेरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. तर कसबा पेठेत २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ता टिळक निवडून आल्या होत्या. परंतु त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे विजयी झाले. त्यामुळे भाजपाकडे (BJP) असलेला कसबा विधानसभ क्षेत्रात काँग्रेसने खाते खोलले. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्ष एकत्र आल्याने धंगेकर यांचा विजय झाला. त्यामुळे महाविकास आघाडीने धंगेकर यांना लोकसभा निवडणुकीत उतरवले. मात्र, दुसरीकडे मनसेने वसंत मोरे यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीची मदत घेऊन त्यांच्यावतीने उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे मोरे यांचेही प्रमुख आव्हान मोहोळ यांच्यासमोर असेल. (Pune Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – महायुती जिंकणार म्हणून विरोधकांच्या छातीत धडकी भरलीय; CM Eknath Shinde यांची टीका)
पुणे शहराचा विकास हा नियोजनबध्द न झाल्याने या भागांत वाहतूक कोंडी ही प्रमुख समस्या असून प्रत्येक घरामागे दुचाकी, चारचाकी वाहने असल्याने रस्त्यांचे एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत वाहनेच अधिक असल्याने वाहतुकीची प्रमुख समस्या निर्माण होत आहे. पुण्यात मेट्रो रेल्वे सुरु केली असली तरी प्रत्यक्षात या मेट्रोला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे. पुण्यातील लोक स्वत:च्या दुचाकींचा वापर करत असताना मेट्रोचा घाट घातल्याने एकप्रकारे नियोजन शुन्य कारभाराचे नमुने दिसून येत आहे. पुणेकरांना भेडसावणारी प्रमुख समस्या म्हणजे पाण्याची. दिवसेंदिवस ही समस्या तीव्र होत चालली असून ही समस्या अद्यापही सुटली जात नाही. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन पर्यायी स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न केला जावा. शहराचे भौगोलिक क्षेत्र वाढल्याने वाहतूक, पाणी, रस्ते, स्वच्छता हे प्रश्न भेडसावत आहेत. (Pune Lok Sabha Election 2024)
मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचार सभा घेऊन मुबईची वाट लागायला एक काळ गेला पण पुण्याची वाट लागायला वेळीही लागणार नाही अशी चिंता व्यक्त केली. त्याचवेळी त्यांनी पुण्याचा विकास हा नियोजनबध्दपणे व्हायला हवा आणि त्यासाठी आपण निवडून आल्यानंतर यकडे लक्ष द्या अशी विनंती मोहोळ यांना केली. मात्र, दुसरीकडे उबाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि आदित्य ठाकरे आदींसह काँग्रेसचे नेते आपली ताकद लावण्याचा प्रयत्न करत आहे, तर मोरे यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर हे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मतदारांचा कल कुणाकडे वळतो हे लवकरच समजेल. पुण्याचे पर्यावरण, वाढती गुन्हेगारी या प्रमुख समस्या असून शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील सुसंस्कृत मतदार हे कुणाला मतदान करून संसदेत पाठवतात हे येत्या होणाऱ्या २० मेच्या मतदानानंतर ४ जुनच्या निकालानंतर स्पष्ट होईल पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन पर्यायी स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न केला जावा. (Pune Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – कॉंग्रेसच्या ‘त्या’ माजी आमदाराचा Pankaja Munde यांना पाठिंबा!)
पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार
- मुरलीधर मोहोळ, भाजपा
- रविंद्र धंगेकर, काँग्रेस
- वसंत मोरे, वंचित बहुजन आघाडी (Pune Lok Sabha Election 2024)
पुणे लोकसभा मतदार संघातील विधानसभा आणि निवडून आलेले आमदार
वडगाव शेरी : सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस
शिवाजीनगर : सिध्दार्थ शिरोळे, भाजपा
कोथरुड : चंद्रकांत पाटील, भाजपा
पर्वती : माधुरी मिसाळ, भाजपा
पुणे : सुनील कांबळे, भाजपा
कसबा पेठ : रविंद्र धंगेकर, काँग्रेस (Pune Lok Sabha Election 2024)
सन २०१९चा लोकसभा निकाल
- गिरीश बापट, भाजपा : ६,३२, ८३५
- मोहन जोशी, काँग्रेस : ३, ०८,२०७ (Pune Lok Sabha Election 2024)
सन २०१४चा लोकसभा निकाल
- अनिल शिरोळे, भाजपा : ५, ६९, ८२५
- विश्वजित कदम, काँग्रेस : २, ५४, ०५६ (Pune Lok Sabha Election 2024)
सन २००९ची लोकसभा निकाल
- सुरेश कलमाडी, काँग्रेस : २,७९,९७३
- अनिल शिरोळे, भाजपा : २, ५४, २७२ (Pune Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community