- खास प्रतिनिधी
भाजपाचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत पिंपरी-चिंचवडमधील बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा ज्वलंत विषय उपस्थित करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आणि फडणवीस यांनी त्यावर योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. (Legislative Assembly Session)
(हेही वाचा – मुंबई पोलिसांना आधुनिक शस्त्र देण्याची Ravindra Waikar यांची संसदेत मागणी)
पश्चिम बंगालमधून भारतात
लांडगे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत विधानसभा सभागृहात पुण्याच्या पिंपरी परिसरातील परिसरातील कुदळवाडी भागात अनधिकृत बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा अड्डा बनला असल्याचे स्पष्ट केले. या भागातून जवळपास अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या ७० बांगलादेशी नागरिकांना परत पाठवले असून अद्याप अनेक आहेत, अशी माहिती दिली. पश्चिम बंगालमधून ते भारतात प्रवेश करतात आणि इथे राहतात, अनेक अनधिकृत व्यवसायही हे लोक करतात आणि प्रदूषण पसरवत असल्याचे लांडगे यांनी निदर्शनास आणून दिले. (Legislative Assembly Session)
(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : के. एल. राहुल चमकला; पण विराट, रोहित फ्लॉप का झाले?)
७० बांगलादेशींना परत पाठवले
“पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आतापर्यंत बेकायदेशीरपणे शहरात वास्तव्य ७० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना मूळ देशात परत पाठवले आहे. बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट तयार करुन हे घुसखोर पश्मिम बंगालमधून भारतात प्रवेश करतात. रोजगाराच्या निमित्ताने आलेले हे बांगलादेशी देशविघात कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांची संख्या वाढू लागली असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे, असे लांडगे म्हणाले. (Legislative Assembly Session)
(हेही वाचा – Maharera Inquiry : महारेराकडून रखडलेल्या प्रकल्पांसाठी बिल्डरवर कारवाई सुरू)
रोजगार आणि सुरक्षेचा प्रश्न
पिंपरी-चिंचवड आणि चाकण, रांजणगाव, तळेगाव आदी एमआयडीसी पट्ट्यात कमी पगारामध्ये काम करण्यासाठी बांगलादेशी घुसखोर सहज उपलब्ध होतात. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही. दुसरीकडे, घुसखोरांचे ‘कनेक्शन’ देशविघातक कृत्यांमध्ये असल्याचे काही घटनांमध्ये समोर आले आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे. ४२ बनावट पासपोर्ट रद्द आणि २३ जणांना अटक केल्याची माहिती लांडगे यांनी दिली. शासनाने सदर पासपोर्ट रद्द केले. त्यामुळे बनावट ओळखीच्या आधारे पिंपरी-चिंचवड, पुणेसह मोठ्या शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे रॅकेट सक्रिय आहे, हे स्पष्ट होते.
लांडगे यांच्या मुद्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यावर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले. (Legislative Assembly Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community