वसंत मोरेंच्या ‘या’ खंद्या शिलेदारासह 400 कार्यकर्त्यांची ‘मनसे’ला सोडचिठ्ठी

134

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर पुणे जिल्हा माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची गेल्या महिन्यात माथाडी कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र या हकालपट्टीनंतर माझिरे यांनी थेट मनसे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे नेते वसंत मोरे यांचे खंदे शिलेदार म्हणून ओळख असणाऱ्या माझिरे यांच्याह तब्बल ४०० कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे ऐन महापालिकेच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे.

(हेही वाचा – चंद्रपूरात वाघापाठोपाठ बिबट्यानेही घेतला माणसाचा बळी)

दरम्यान, २८ नोव्हेंबर रोजी वसंत मोरे यांचे निकटवर्तीय निलेश माझिरे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. माझिरे हे मनसेच्या पुणे जिल्हा माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष होते. या पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याने त्यांनी मनसे हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर माझिरे यांच्या ४०० मनसैनिकांनी देखील मनसेचा राजीनामा दिला आहे.

तर माझिरे यांची हकालपट्टी आणि राजीनामा यामुळे पुण्यातील मनसेत काहीच अलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्याच आठवड्यात मनसे नेते वसंत मोरे यांनीही पक्षाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. यावेळी पक्षातील पदाधिकारी आपल्याला विश्वासात घेत नाहीत. बैठकांना बोलवत नाहीत, मेळाव्याला, सभांना गेलं तरी भाषण करण्याची संधी देत नाही, असा आरोप वसंत मोरेंनी केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.