पुण्यातील मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्या माजी शहराध्यक्षांनी पक्षाला आज सोमवारी रामराम ठोकला आहे. निलेश माझीरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेर ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. वसंत मोरे पक्षात साईडलाईन झाल्यानंतर मनसेला हा पुण्यातील मोठा धक्का मानला जात आहे.
…असे सांगत माझिरेंनी पक्ष सोडल्याचं केले जाहीर
“मी आज पक्ष सोडण्याचं मुख्य कारण म्हणजे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर तसेच कोअर कमिटीतील इतर सदस्य आहेत” असं सांगत माझिरे यांनी पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं आहे.
(हेही वाचा – मास्कसक्तीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत काय झाली चर्चा? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती)
हुकूमशाही सुरू असल्याचा माझीरेंचा आरोप
पुढे माझीरे असेही म्हणाले की, १९ मे रोजी मनसे सोडणार असल्याच्या काही बातम्या आल्या होत्या. त्यानंतर माझीरे यांची हकालपट्टी करा, असे बाबर म्हणाले होते, तर बाबू वागस्कर यांनी तू पक्षात राहणार आहेस का, अशी विचारणा केली होती. मला बोलावून घेऊन विचारता तुम्ही पक्षात राहणार आहात का, असं म्हणत सर्व हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community