मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकवल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाला व्हाॅट्सअॅप मेसेज करुन खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ या आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. या आरोपीने धमकी का दिली याचा शोध सध्या पोलीस करत आहेत. परंतु या आरोपीला अटक केल्याप्रकरणी वसंत मोरे यांनी कानून के हाथ लंबे होते है, अशी सूचक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे.
वसंत मोरेंची फेसबूक पोस्ट
भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर वसंत मोरे यांनी सूचक पोस्ट केली आहे. तसेच, पोलिसांचे आभारही मानले आहेत. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. कानून के हाथ लंबे होते है, धन्यवाद, भारती विद्यापीठ पोलीस, असे वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. वसंत मोरे यांच्या या पोस्टवर मोरे समर्थकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
( हेही वाचा: हिंदूंचा बदला घेणार, भारतात रक्ताचे पाट वाहतील; कोईम्बतूर मंदिर स्फोटाची जबाबदारी इसिसने स्वीकारली )
काय आहे प्रकरण?
वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांना व्हाॅट्स्ॅपवर एक मेसेज आला होता. अल्पिया शेथ या नावाने हा मेसेज आला होता. त्यात त्यांच्याकडे 30 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. तुझ्या विवाहाचे बनावट सर्टिफिकेट करण्यात आले आहे. 30 लाख रुपये दे नाहीतर या सर्टिफिकेटचा गैरवापर करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली होती. तसेच, त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
Join Our WhatsApp Community