पुणे म्हटले की विविध कल्पना आल्याच. पुणेकरांना कधी काय सुचेल त्याचा नेम नाही. त्यात सामान्य नागरिक आले आणि पोलिसही आले. सरकारने दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती केली, मात्र पुणेकरांनी साफ त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे पुण्यात पोलीस रस्तोरस्ती फिरून दुचाकीस्वारांना गुलाब देऊन हेल्मेट घालण्याची विनंती करत आहे. तसा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. ही काय फालतुगिरी चाललीय? कायदा सर्वांना समान आहे ना?मग विना हेल्मेट लोकांना दंड करा, असे पुण्यातल्या पोलिसांना सुनावले आहे.
ही काय फालतुगिरी चाललीय ?
कायदा सर्वांना समान आहे ना ?
मग विना हेल्मेट लोकांना दंड करा.— P s s (@RSutar217) May 24, 2023
काही जण म्हणाले की, फुलांवर फुकट खर्च झाला…ज्यांना स्वतःच्या डोक्याची काळजी नाही त्यांना असल्या फुलांनी काही फरक पडणार नाही. #शहाण्याला_शब्दाचा_मार.
फुलांवर फुकट खर्च झाला…ज्यांना स्वतः च्या डोक्याची काळजी नाही त्यांना असल्या फुलांनी काही फरक पडणार नाही. #शहाण्याला_शब्दाचा_मार
— C9H16O2 (@Benevolantly) May 24, 2023
तर काही जण पोलिसांची खिल्ली उडवत आहेत.मा. पोलीस खातं! मला एक गोष्ट नाही कळाली. शहराच्या आतमध्ये जिथे गाडीचा वेग चुकूनही 50 किमी च्या पुढे जात नाही तिथे हेल्मेटची सक्ती आणि महामार्गावर गाड्या कधीच 100 किमी पेक्षा कमी वेगाने पळत नाहीत तिथे हेल्मेटची सक्तीच नाही? असे का?
मा. पोलीस खातं!
मला एक गोष्ट नाही कळाली. शहराच्या आतमध्ये जिथे गाडीचा वेग चुकूनही 50 किमी च्या पुढे जात नाही तिथे helmet ची सक्ती आणि highway वर गाड्या कधीच 100 किमी पेक्षा कमी वेगाने पळत नाहीत तिथे helmet ची सक्तीच नाही?
असे का?— Aquaman🌊🔱 (@tucch_manushya) May 24, 2023
एक जण म्हणतो पाणी द्या आणि गार गार आईस्क्रीम वगैरे द्या कोथरुडला तरी.
पाणी द्या आणि गार गार आईस्क्रीम वगैरे द्या कोथरुडला तरी.
— एक सोच (@I_Hrsh) May 24, 2023
(हेही वाचा Modi Cabinet : मोदी मंत्रीमंडळात फेरबदलाचे संकेत; आगामी निवडणुका असलेल्या राज्यांना प्राधान्य)
Join Our WhatsApp Community