संजय राऊत धमकी प्रकरणात पुण्यातून एकजण ताब्यात

69

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोईच्या या कुख्यात टोळीच्या नावाने जीवे मारण्याचा धमकीचा संदेश आला आहे. दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकू अशी धमकी संदेशाद्वारे राऊतांना देण्यात आली आहे. याप्रकरणी आता पुण्यातून एकाला ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे.

माहितीनुसार, संजय राऊत यांच्या धमकी प्रकरणात पुण्यातून एका तरुणास पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल तळेकर (वय-२३, राहणार वडगाव शेरी, पुणे) असे या तरुणाचे नाव असून पुणे पोलिसांनी त्यास पुढील तपास करण्याकरता मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी येथे माध्यमांना दिली आहे.

दरम्यान खराडी चंदननगर परिसरातून एका हॉटेलमधून राहुल तळेकर यास ताब्यात घेतले आहे. तळेकर हा एका हॉटेलमध्ये काम करत आहे. त्याने अशाप्रकारचे कृत्य कशासाठी केले आहे, तसेच त्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी नेमका काय संबंध आहे, याबाबतचा तपास पोलीस करत आहे.

(हेही वाचा – “सलमान और तू फिक्स, तयारी करके रखना” संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.