Pune Rain Update: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून आढावा; सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश 

201
Pune Rain Update: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून आढावा; सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश 
Pune Rain Update: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून आढावा; सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश 

पुणे जिल्ह्यात (Pune District) पुन्हा एकदा मुसळधार पाऊस (Heavy rain in Pune) कोसळू लागल्याने शहर आणि आसपासच्या भागात पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनीही नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. आवश्यकता भासल्यास एनडीआरएफची मदत घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशीही माहिती अजित पवार यांनी दिली आहे.  (Pune Rain Update)

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

पुणे जिल्ह्यातील खडकवासला (Khadakwasla Dam), पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूर रेषेलगतच्या तसेच कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने कृष्णाकाठच्या गावातील, पूररेषेलगत व सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे व त्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त, संबधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांनीही स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

(हेही वाचा – Farmers : नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार ५९६ कोटी; अनिल पाटील यांची माहिती)

सातारा पुण्यात ‘रेड अलर्ट’ 

भारतीय हवामान खात्याने पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ (Satara Pune Red Alert) जारी केला आहे. कोयना धरणक्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. खडकवासला धरणातून सध्या 27 हजार 16 क्युसेक्स, मुळशीतून 27 हजार 609 क्युसेक्स, पवनातून 5 हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून 8 हजार 50 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.  (Pune Rain Update)

(हेही वाचा – MLA Disqualification Case : उद्धव ठाकरेंना Supreme Court कडून दिलासा मिळण्याची आशा उल्हास बापट यांनी सोडली)

यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला तसेच पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिचवडचे महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा केली. अतिवृष्टीच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवीर नागरिकांच्या जीविताच्या आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना, कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. आवश्यकता भासल्यास एनडीआरएफ ची मदत घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही त्यांनी  केल्या आहेत. (Pune Rain Update)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.