पंजाबचे प्रसिद्ध गायक सिध्दू मुसेवाला यांच्या हत्येनंतर पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले आहे. पंजाब सरकारने एक दिवस आधीच सिध्दू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या झाल्याचे समोर आले. मात्र आता पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने आप सरकारला ४२४ सेलिब्रिटिंना पुन्हा सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. पंजाबमधील व्हीव्हीआयपी सुरक्षा काढून घेण्याबाबत पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.
(हेही वाचा – Facebook च्या COO शेरिल सँडबर्ग यांचा राजीनामा, मार्क झुकरबर्ग म्हणाले…)
मिळालेल्या माहितीनंतर, पंजाबमधील व्हीव्हीआयपी सुरक्षा काढून घेण्याबाबत पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. मागील सुनावणीदरम्यान, न्यायालयाने सरकारकडून उत्तर मागितले होते. यासंदर्भात आज सुनावणी झाली. ज्यामध्ये उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला 7 जून पासून 424 सेलिब्रिटिंना पुन्हा सुरक्षा बहाल करण्याचे आदेश दिले आहेत.
अलीकडेच पंजाबमध्ये सुरक्षा पुनरावलोकनानंतर 424 जणांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. गायक सिद्धू मुसेवाला हे देखील त्यापैकीच एक होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर भगवंत मान सरकार यांच्यावर टीका करण्यात आली आणि प्रकरण न्यायालयात दाखल झाले. दरम्यान, पंजाब काँग्रेसचे नेते आणि प्रसिद्ध गायक सिध्दू मुसेवाला यांच्या हत्येची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत करण्याची मागणी देखील केली आहे. यासह मुसेवालांच्या कुटुंबियांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले असल्याची माहितीही केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी दिली.
Join Our WhatsApp Community