पंजाब सरकारचे योगींच्या पावलावर पाऊल

120

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील अतिक्रमित क्षेत्रांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे योगींची देशभरात प्रसिद्धी होत असतानाच, आता पंजाब सरकारनेही योगींच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सरकारी जमिनींवर अतिक्रमण केलेल्यांना गंभीर इशारा दिला आहे. अतिक्रमण करणा-यांनी सरकारी जमिनींचा ताबा 31 मेपर्यंत सोडण्याचे अल्टिमेटम मान यांनी दिले आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

भगवंत मान यांचे ट्वीट

सरकारी आणि ग्राम पंचायतींच्या जमिनींवर अतिक्रमण करणा-यांनी या जमिनी सरकारला परत केल्या नाहीत, तर त्यांच्या गुन्हे देखील दाखल केले जाऊ शकतात, असा इशारा मुख्यमंत्री मान यांनी ट्वीट करत दिला आहे. सरकारी आणि ग्राम पंचायतींच्या जमिनींचा बेकायदेशीररित्या ताबा घेतलेल्या राजकीय नेते, अधिकारी किंवा कुणीही श्रीमंत व्यक्तींना मी विनंती करत आहोत की त्यांनी 31 मे पर्यंत अतिक्रमण केलेल्या जमिनींवरील कब्जा सोडून, त्या जमिनी सरकारला परत कराव्यात, असे आवाहन मान यांनी या ट्वीटद्वारे केले आहे. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीत कारवाई

दिल्लीतील अनेक भागांमध्ये अतिक्रमित बांधकांमांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. दिल्लीतील द्वारका सेक्टर 3 सह अनेक भागांमधील बेकायदेशीर बांधकामांवर बुधवारी बुलडोझर चालवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या हा इशारा महत्वाचा असल्याचे म्हटले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.