दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला. त्यानंतर ‘आप’च्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता ‘आप’ला राजकीय आणि कायदेशईर आघाड्यांवर समस्यांचा सामना करावी लागणार आहे. दिल्लीनंतर आता ‘आप’च्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Punjab)
( हेही वाचा : धार्मिक द्वेष पसरवल्याप्रकरणी Jitendra Awhad यांच्यावर एफआयआर दाखल)
काँग्रेस पंजाबमधील ‘आप’चे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यावर जलदगतीने खटला चालवण्यासाठी सीबीआयने पावले उचलली आहेत. ‘आप’ला एकाच वेळी अनेक आघाड्यांवर आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील पराभवानंतर पंजाबमधील काँग्रेसने सरकार पाडण्यासाठी काम सुरू केले आहे. पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा (Partap Singh Bajwa) यांनी दि. ९ फेब्रुवारी रोजी दावा केला की, सत्ताधारी ‘आप’चे ३० आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत. (Punjab)
दरम्यान गेल्या एक वर्षापासून हा संपर्क सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे सर्व आमदार ‘आप’ला सोडून काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहेत. त्यांनी पक्षातील अंतर्गत संघर्षाचाही उल्लेख केला आहे. प्रताप सिंह बाजवा (Partap Singh Bajwa) यांनी दावा केला आहे की, केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पदावरून हटवून स्वतः मुख्यमंत्री बनण्याचे पाऊल उचलू शकतात. येत्या काही दिवसांत पंजाबमधील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे आणि केजरीवाल या जागेवरून आपले नशीब आजमावू शकतात, असे बाजवा यांनी म्हटले आहे. (Punjab)
पुढे बाजवा म्हणाले की, “आप प्रमुख केजरीवाल त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांची मोठी फौज जमवून केंद्रीय एजन्सींकडून होणारी चौकशी आणि कारवाई टाळून आणि निधी उभारून पंजाबचे मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न करतील.” भगवंत मान दिल्लीतील भाजप हायकमांडशी आपले संबंध सुधारण्यात व्यस्त आहेत, असा दावाही बाजवा (Partap Singh Bajwa) यांनी केला. येत्या काळात राज्यातील अनेक नेते आप सोडू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. (Punjab)
पंजाब काँग्रेसचे (Congress) प्रमुख खासदार अमरिंदर सिह राजा वारिंग (Amrinder Singh Raja Warring) म्हणाले की, ‘आप’ने पंजाबमधूनही आपले बस्तान बांधले पाहिजे. त्याच वेळी, ‘आप’ने पक्षात फूट पडण्याचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. पंजाब ‘आप’चे प्रवक्ते नील गर्ग म्हणाले, “केजरीवाल आमचे राष्ट्रीय संयोजक आहेत आणि भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसचा (Congress) आलेख रसातळाकडे जात आहे. दिल्लीत त्याची कामगिरी सलग तिसऱ्यांदा शून्य राहिली आहे.
२०२७ च्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी २०२२ पेक्षाही वाईट असेल, असा दावा नील गर्ग यांनी केला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्या ११७ जागांच्या पंजाब विधानसभेत ‘आप’कडे प्रचंड बहुमत आहे. त्यांच्याकडे ९३ आमदार आहेत तर काँग्रेसकडे फक्त १६ आमदार आहेत. राज्यात शिरोमणी अकाली दलाचे ३ तर भाजपचे २ आमदार आहेत. काँग्रेस सतत म्हणत आहे की, त्यांची बहुतेक मते ‘आप’ने घेतली आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये ‘आप’च्या अंतर्गत कलहानंतर ते आता पुनरागमन करण्याच्या मूडमध्ये आहेत.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community