Election Result 2022: पंजाबमध्ये ‘आप’च बाप! काँग्रेसला ‘झाडू’न काढले

150

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांपासूनच आम आदमी पक्षाने मुसंडी मारल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे निवडणुकींच्या कलांनुसार, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल्याचे जवळपास निश्चितच झाले आहे. आपने जवळपास 89 जागांवर आघाडी मिळवली असून सत्ताधारी काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. तर काँग्रेसची 17 जागांवर आघाडी आहे. निवडणूक निकालांतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह पराभूत झाले आहेत. त्यामुळे पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मोठे यश मिळाले आहे. राज्यातील 117 विधानसभा सर्वाधिक जागांवर ‘आप’ने आघाडी घेतली असून काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय झालीय तर पंजाबच आपच बाप ठरला आहे.

‘आप’ची आघाडी असून ‘झाडू’न विजय

आतापर्यंत राज्यातील विधानसभेच्या 117 जागांपैकी ‘आप’ने सुमारे 89 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 17, शिरोमणी अकाली दल 7 आणि इतरांना 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या हातात असलेले हे राज्य हातातून जाण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये महत्वाचं म्हणजे क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोघांमधून विस्तवही जात नसल्याने अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने लगेचच चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अमरिंदर सिंह यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला असून भाजपसोबत युती करून निवडणुक लढवली. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे मनजिंदर सिंह सिरसाही भाजपमध्ये सहभागी झाले होते.

(हेही वाचा – Election Result 2022: गोव्यात भाजपच्या बंडखोर पर्रिकरांचे पंख छाटले )

केजरीवालांनी केले पंजाबच्या जनतेचे कौतुक

पंजाब विधानसभा निवडणुकीत मोठी आघाडी घेत ज्वलंत विजयाकडे वाटचाल करीत असलेल्या आम आदमी पक्षाच्या विजयी अभियानावर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केला आणि जनतेचे कौतुक, अभिनंदन केले.

ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, ” या ‘इंक़लाब’ साठी पंजाबच्या लोकांचे हार्दिक अभिनंदन.” यावेळी अरविंद केजरीवालांनी पंजाबचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि संगरूर खासदार भगवंत मान यांच्यासोबत विजयी मुद्रेतील छायाचित्र प्रसिद्ध केले.

(हेही वाचाः शिवसेना-राष्ट्रवादीला ‘नोटा’चा कोटाही पूर्ण करता येईना! भाजपची बोचरी टीका)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.