पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांचा पक्ष लवकरच भाजपमध्ये विलीन होणार

114

माजी काँग्रेस नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पक्षाला टाटा-बाय बाय करत काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर पंजाब विधानसभा निवडणुकांआधी आपला स्वतःचा पक्ष स्थापन करणारे अमरिंदर सिंह हे आपला पक्षच आता भाजपमध्ये विलीन करण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली असून 19 सप्टेंबरला ते आपल्या पक्षासह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकांधी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाब लोक काँग्रेस या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती. निवडणुकीत त्यांना फारसे यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे ते आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.

(हेही वाचाः नवी मुंबईत राष्ट्रवादीला मुख्यमंत्र्यांचा धक्का, माजी नगरसेवकांसह तालुकाध्यक्ष शिंदे गटात)

पक्ष भाजपमध्ये विलीन होणार?

त्यानुसार, कॅप्टन सिंह हे आपली मुलगी जय इंदर कौर,मुलगा रणइंदर कौर आणि नात निर्वाण सिंह यांच्यासह भाजपमध्ये सहभागी होऊ शकतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीत 19 सप्टेंबरला कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन होऊ शकतो. तसेच पंजाबमधील अर्धा डझन माजी आमदारही भाजपमध्ये सहभागी होऊ शकतात.

कॅप्टन सिंह यांचा दारुण पराभव

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पत्नी परनीत कौर या मात्र अजूनही काँग्रेसच्या खासदार आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी भाजपसोबत युती करत पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता. स्वतः कॅप्टन सिंह यांना देखील पटियाला मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अलिकडेच कॅप्टन सिंह यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.