सध्याचे पंजाब सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध सक्रिय झाले आहे. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या दक्षता ब्युरोने रविवारी (९ जुलै) माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात अटक केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आदेशानुसार सोनी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोनी यांना रविवारी रात्री अटक केली असून त्यांना आज म्हणजेच सोमवार १० जुलै रोजी अमृतसर न्यायालयात हजर केले जाणार आहे. सोनी हे चन्नी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. ओपी सोनी तत्कालीन चन्नी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.
(हेही वाचा – हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकरांचे WhatsApp चॅट्स उघड; एटीएसकडून आरोपपत्र दाखल)
दक्षता पथकाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत माजी उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न ४,५२,१८,७७१ रुपये होतं, तर खर्च १२,४८,४२,६९२ रुपये इतका होता. आरोपी ओपी सोनी यांनी पत्नी सुमन सोनी आणि मुलगा राघव सोनी यांच्या नावे मालमत्ता जमा केली होती.
दक्षता पथकाच्या प्रवक्त्यांनी पुढे सांगितलं की, तपासाअंती ओपी सोनी यांच्याविरुद्ध अमृतसर रेंज पोलीस स्टेशन दक्षता ब्युरोमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (बी) आणि १३ (२) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community