उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कोट्यवधी हिंदू महाकुंभमध्ये (Mahakumbh) जाऊन पवित्र स्नान करत आहेत. हिंदूंच्या संघटनांसाठी हा मोठा उत्सव जगाला अचंबित करणारा ठरत आहे. अशावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभचा (Mahakumbh) अवमान करणारे वक्तव्य केले, त्यामुळे हिंदूंमध्ये प्रचंड संताप उमटत आहे. आता महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना तुरुंगात टाका, अशी मागणी केली आहे.
(हेही वाचा Shiv Jayanti 2025 : शिवजयंतीच्या दिवशी राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली; भाजपाने दिला इशारा
काय म्हणाले महंत अनिकेतशास्त्री महाराज?
ममता बॅनर्जी यांनी महाकुंभ (Mahakumbh) विषयी अत्यंत दुर्दैवी वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले कि हा अमृतकुंभ नव्हे मृत कुंभ आहे. त्यांचे विचार आणि बुद्धीची दया येत आहे. तसेच वाईट वाटत आहे की, त्यांची वयासोबत बुद्धीही भ्रष्ट होऊ लागली आहे. त्यांनी सर्व हिंदूंची माफी मागितली पाहिजे. अन्यथा याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची हत्या होत आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. डॉक्टर संपावर गेले आहेत. यावर त्या काहीही बोलत नाहीत. परंतु समस्त हिंदूंची भावना ज्याच्याशी जोडली गेली आहे, अशा महाकुंभविषयी (Mahakumbh) त्या बेताल वक्तव्य करत आहेत. एका मुख्यमंत्र्याला हे शोभा देत नाही. केंद्र सरकारकडे मी मागणी करतो की, त्यांच्यावर समाजविघातक कृत्य, भारताची अखंडता आणि शांतता भंग करण्याच्या अंतर्गत कडक करवाई झाली पाहिजे. देशद्रोह आणि राष्ट्रद्रोह सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल करून त्यांना कारागृहात पाठवले पाहिजे.
Join Our WhatsApp Community