Muslim : मुस्लिम मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदानाच्या दिवशी निकाह न लावण्याचा काझीचा निर्णय

मतदानाच्या दिवशी शहरातील विविध भागांत ठरलेले सात निकाह पुढे ढकलून ते मंगळवारी, २१ नोव्हेंबर रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

92

लोकसभा निवडणुकीत मुसलमानांनी (Muslim) मोठ्या संख्येने मतदान करून रालोआच्या विरोधात मतदान केले होते. ज्यामुळे देशभरात भाजपा आणि मित्र पक्षांना मोठे नुकसान झाले.यातून Vote Jihad चा चेहरा समोर आला. आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा Vote Jihad ची तयारी सुरु झाली आहे. नाशिकमध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी निकाह लावणार नसल्याचा निर्णय मुस्लिम धर्मगुरू शहर-ए-काझी एजाज काझी यांनी घेतला आहे.

(हेही वाचा मुंबईत २०५१ पर्यंत हिंदूंची लोकसंख्या अवघी ५४ टक्के होणार; TISS चा खळबळजनक अहवाल)

सार्वजनिक कार्यक्रमही पुढे ढकलले 

विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी शहरातील विविध भागांत ठरलेले सात निकाह पुढे ढकलून ते मंगळवारी, २१ नोव्हेंबर रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इतर सार्वजनिक कार्यक्रमही सोमवारी आयोजित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुस्लिम (Muslim) धर्मगुरू शहर-ए-खतीब हाफिज हिसामोद्दीन खतीब आणि शहर-ए-काझी एजाज काझी यांनी मुस्लिम मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.