पत्रकाराने कन्हैया कुमारला विचारला प्रश्न; समर्थकाने मात्र PM Narendra Modi यांना दिली शिवी 

287

काँग्रेस नेता कन्हैया कुमारच्या समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) आईवरून अश्लिल शिव्या दिल्या. संबंधित व्हिडिओ ‘भाजप छत्तीसगड’ ने X अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणी बिलासपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपीची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

अरविंद कुमार सोनी असे आरोपीचे नाव आहे. बिलासपूरच्या एएसपी (ग्रामीण) यांनी सांगितले की, त्यांनी सोनीला मस्तुरी गावातून पकडले आहे. कन्हैया कुमार मीडियाशी बोलत असताना त्यानेच पंतप्रधानांना शिवीगाळ केली. भाजपने व्हिडिओ शेअर करताना याबाबत ट्विट केले होते. त्यांनी लिहिले होते, “घृणास्पद काँग्रेस…काँग्रेसच्या तुकडे-तुकडे टोळीच्या नेत्यासमोर पंतप्रधानांना  (PM Narendra Modi) त्यांच्या आईबद्दल शिवीगाळ करण्यात आली आणि तेथे उपस्थित काँग्रेसजन यावर काहीही बोलले नाहीत. मानसिकदृष्ट्या दिवाळखोर झालेला हा पक्ष महिलांबद्दल आपले मत काय आहे हे देश पाहत आहे.”

(हेही वाचा Iran Israel War : इराणचा इस्राईलवरील हवाई हल्ला ठरला प्रभावहीन; कोण आहे यामागे कारणीभूत?)

व्हिडिओमध्ये काय आहे?

कन्हैया कुमारला त्याच्या समर्थकांनी घेरले आणि हसत हसत निघून जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. लोक मागून ‘कन्हैया कुमार झिंदाबाद’च्या घोषणाही देत आहेत. यादरम्यान एक पत्रकार त्याला विचारतो, त्याने पंतप्रधान मोदींना  (PM Narendra Modi) भेकड म्हटले आहे, पोपट ज्योतिषी म्हटले आहे, रावण देखील म्हटले आहे… कन्हैया प्रतिक्रिया देण्यापूर्वी, मागून एक आवाज ऐकू येतो, ज्यात तो समर्थन मोदींना शिवी देतो. हे शब्द तिथे उभ्या असलेल्या सर्व लोकांना ऐकू येतात, पण अशी भाषा वापरण्यास नकार देण्याऐवजी कन्हैया हसतो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.