Rahul Gandhi यांच्या मुंबईतील सभेवर प्रश्नचिन्ह; वाहतूक पोलिसांनी घेतला आक्षेप

142
Rahul Gandhi यांच्या मुंबईतील सभेवर प्रश्नचिन्ह; वाहतूक पोलिसांनी घेतला आक्षेप
Rahul Gandhi यांच्या मुंबईतील सभेवर प्रश्नचिन्ह; वाहतूक पोलिसांनी घेतला आक्षेप

येत्या 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील बीकेसीमध्ये काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा होणार आहे. मात्र या सभेवर वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) आक्षेप घेतला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएला पाठवलेल्या पत्रात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सभेमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई पोलिसांच्या या भूमिकेवर काँग्रेस काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या मुंबईतील सभेवर प्रश्नचिन्ह; वाहतूक पोलिसांनी घेतला आक्षेप)

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे खासदार राहुल गांधी यांची सभा होणार आहे. या सभेला मुंबई वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. बीकेसीमध्ये 20 ऑगस्ट रोजीच्या या सभेवरील आक्षेप वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएकडे पाठवला आहे. वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएला सांगितले आहे की, सायन रेल्वे स्थानकावरील रोड ओव्हर ब्रिज बंद झाल्यामुळे संपूर्ण वाहतूक बीकेसीमधून जात आहे. त्यामुळे बीकेसीमध्ये आताच्या स्थितीतही वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यात राहुल गांधी यांच्या सभेचा या वाहतूक कोंडीवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

काय आहे परिस्थिती ?

बीकेसी परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामामुळे पूर्वीपेक्षा रस्त्याची रुंदी कमी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या सभेला किमान 20 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सायन आरओबी बंद झाल्यापासून बीकेसीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची सभा किंवा रॅली आयोजित करण्यात आलेली नाही, असे मुंबई वाहतूक पोलिसांचे मत आहे. पोलिसांच्या या भूमिकेबाबत एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “एमएमआरडीए कोणत्याही राजकीय रॅलीसाठी परवानगी देत ​​नाही. एमएमआरडीए केवळ त्यांचे भूखंड भाड्याने देते. कोणत्याही रॅलीसाठी किंवा सभेसाठी आयोजकांना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. या एजन्सीजने आवश्यक परवानगी न दिल्यास एमएमआरडीए कोणत्याही रॅली किंवा सभेसाठी भूखंड देऊ शकत नाही.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.