माझ्यावर आरोप झाले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. म्हणाले, याच्यावर 70 हजार कोटींचा आरोप करुयात. अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते. महाराष्ट्राची 1 मे 1960 ला निर्मिती होऊन ते माझ्यावर आरोपाच्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42 हजार कोटींचा झाला आणि मला 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला म्हणाला. त्यातून एक फाईल निर्माण झाली. ती फाईल गृह खात्याला जाते. आर. आर. आबांनी त्या फाईलीवर अजित पवारांची उघड चौकशी करावी म्हणून सही केली. केसाने गळा कापायचे धंदे आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तासगाव येथील जाहीर सभेत अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.
आपण पृथ्वीराज चव्हाणांचा पाठिंबा काढून घेतला, सरकार गेले, तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली, त्या वेळचे राज्यपाल म्हणाले, मी या फाईलवर सही करणार नाही. नवीन सरकार येईल, त्याचा मुख्यमंत्री करेल. निवडून आले देवेंद्र फडणवीस सरकार, देवेंद्र फडणवीसांनी सही केली. मला घरी बोलावले, मुख्यमंत्र्याकरता जी सही होती, ती त्यांनी केली, तेव्हा गृहमंत्री म्हणून आबांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते, त्यांची सही दाखवली. मला इतके वाईट वाटले. जीवाभावाचा सहकारी होता, आपले काहीतरी चुकले असेल, त्यामुळे कामाला लावले असेल, असा आरोप अजित पवारांनी (Ajit Pawar) आबांवर केला.
मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर बडे बडे शहरो मे छोटे-छोटे हातसे होते रहते है असे म्हणाले आणि आर. आर. पाटील यांना कोणीतरी राजीनामा द्यायला सांगितला. आबांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला, तेव्हा तो न सांगता अंजनीला निघून आला. मला सांगायचे ना…मला सांगितले नाही. १५ दिवस, महिनाभर लोक भेटायला आले, त्यानंतर कुणी भेटायला आले नाही. तेव्हा मला म्हटला, दादा कुणी भेटायला येत नाही, लोक किती स्वार्थी आहेत. पहिले रिघ लागायची. तेव्हा मी म्हटलं, काळजी करू नको, मी बघतो. तेव्हा मी विनायक मेटे यांना हेलिकॉप्टरने आबांना घ्यायला पाठवले आणि त्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद दिले, अशी अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
Join Our WhatsApp Community