दिल्लीच्या निवडणुकीत (Delhi Assembly Election) आम आदमी पक्षाचा (Aam Aadmi Party) पराभव झाला. तर भाजपाने २७ वर्षांचा वनवास संपवून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपाच्या विजयावर काँग्रेस (Congress) नेते रशीद अल्वी (Raashid Alvi) यांनी धक्कादायक विधान केलं आहे. रशीद अल्वी म्हणाले की, काँग्रेस पक्षामुळे राजधानी दिल्लीत भाजपाला विजय मिळाला आहे. मुळात काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) एकत्र निवडणूक लढवली असती तर भाजपा (BJP) जिंकली नसती. त्यामुळे भाजपाला पराभूत करण्यासाठी इंडी आघाडीतील सर्व पक्षांनी एकमेकांचा आदर करत, आघाडी धर्म पाळत एकत्र निवडणूक लढवायला हवी होती, असा घरचा आहेर रशीद अल्वी यांनी काँग्रेसला दिला.
( हेही वाचा : BMC : रस्ते काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण करण्यासाठी आयुक्तांनी दिली ३१ मे ही डेडलाईन)
दिल्ली विधानसभेत (Delhi Assembly Election) भाजपाला (BJP) ४८ जागा आणि ‘आप’ला २२ जागांवर विजय मिळालेला आहे. त्यामुळे दिल्लीत भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. अशातच मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत प्रवेश वर्मा (Parvesh Verma), वीरेंद्र सचदेवा (Virendraa Sachdeva) , मनजिंदर सिंह सिरसा, विजेंद्र गुप्ता, रेखा गुप्ता यांची नावे चर्चेत आहेत.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community