काँग्रेसचा ‘तरुण’ चेहरा झाला ५३ वर्षांचा

176

कोणत्याही निवडणुकीत काँग्रेसचा ‘तरुण’ चेहरा म्हणून राहुल गांधी यांचे नाव पुढे केले जाते. हा काँग्रेसचा ‘तरुण’ चेहरा आता ५३ वर्षांचा झाला आहे. आज राहुल यांच्या वाढदिवसानिमित्त नेटकऱ्यांनी त्यांना भन्नाट शुभेच्छा दिल्या असून, ५३ वर्षांच्या या काँग्रेसच्या माजी अध्यक्षाला ‘तरुण’ म्हणावे का, असा सवालही उपस्थित केला आहे.

राहुल गांधी म्हणजे सदैव वादात अडकणारे नेतृत्व. मोदी आडनावाच्या बदनामीप्रकरणी सुरतच्या न्यायालयाने त्यांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. त्याआधारे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार २४ तासांच्या आत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. लोकप्रतिनिधी कायदा १९५१नुसार केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी हे त्यांच्या दोषसिद्धीच्या तारखेपासून म्हणजे २३ मार्च २०२३पासून लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरले आहेत.

त्यामुळे पुढील सहा वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. परिणामी, त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी २०३४ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्षे असेल.

(हेही वाचा – नरेंद्र मोदींकडे पंतप्रधानपद नसते तर, भारताची स्थिती झाली असती श्रीलंकेसारखी – मंगल प्रभात लोढा)

संपत्ती किती?

  • २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी गेल्या सलग ५ वर्षांपासून सुमारे १ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर आयकर भरला होता.
  • त्यांच्या नावावर घर नाही तर दुकान आहे. राहुल गांधींच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची मालमत्ता सुमारे १५ कोटी रुपये आहे, तर त्यांच्यावर सुमारे ७२ लाख रुपयांचे कर्ज आहे.
  • राहुल गांधी यांचे दिल्लीतील महरौली येथे एक शेत आहे ज्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे.
  • गुरुग्राममधील एका व्यावसायिक इमारतीत त्यांची जागा आहे. त्याची किंमत ८.७५ कोटी रुपये आहे.

महाराष्ट्र विधिमंडळात मारले जोडे

  • राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले होते.
  • सत्ताधारी भाजप-शिवसेना आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार निरदर्शने करीत जोडेमारो आंदोलन केले.
  • तसेच विधानसभेतही गांधी यांनी वीर सावरकर आणि देशाची माफी मागावी अशी मागणी करीत सभागृहाचे कामकाज रोखले.
  • एखाद्या पक्षाच्या नेत्याविरोधात विधानभवनाच्या आवारात जोडे मारो आंदोलन करण्याची ही पहिलीच घटना होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.